Contact Banner

मुक्ताईनगरातून रोहिणी खडसे नव्हे, मीच इच्छुक – एकनाथराव खडसे.

        जळगाव :  (शाम पाटील लेवाजगत वृत्त सेवा -)
मुक्ताईनगर विधानसभा मतदार संघातून भाजपच्यावतीने सध्या रोहिणी खडसे – खेवलकर यांच्या नावाची चर्चा असली तरी या मतदारसंघातून मीच इच्छुक आहे, असे खुद्द माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनीच सांगितले.

माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचा मतदार संघ असलेल्या जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर विधानसभा मतदार संघातून या वेळी खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे – खेवलकर यांना उमेदवारी मिळण्याची चर्चा आहे. त्यावर खडसे यांना विचारले असता ते म्हणाले की, पक्ष जो निर्णय घेईल, तो घेईल, मात्र या मतदार संघातून मीच इच्छुक आहे. पक्षात येणाऱ्यांची निष्ठा तपासल्यास निष्ठावंतांवर अन्याय होणार नाही भाजपमध्ये येणाऱ्यांची संख्या सध्या मोठी असल्याने १४ रोजी जळगावात झालेल्या भाजप शक्ती केंद्र प्रमुखांच्या बैठकीत खडसे यांनी पक्षात येणाºयांची निष्ठा तपासा, असे आवाहन केले होते.

त्या विषयी त्यांना विचारले असता खडसे म्हणाले की, या पूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीदेखील पक्षात येणाºयांच्या निष्ठेबाबत वक्तव्य केले होते. त्या वक्तव्याशी मी सहमत असल्याचे खडसे यांनी स्पष्ट केले. पक्षात येणाऱ्यांची निष्ठा तपासल्यास पक्षातील निष्ठावंतांवर अन्यायही होणार नाही, असेही त्यांनी बोलून दाखविले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.