Contact Banner

लेवा पाटीदार मित्र मंडळ औरंगाबाद व समाजातर्फे विविध कार्यक्रम व पुस्तक प्रकाशन

माधुरी चौधरी यांची कविता स्त्रीजाणिवा तरलतेने मांडणारी -डॉ. गादगे

लेवा पाटीदार मित्र मंडळ औरंगाबाद व समाजातर्फे विविध  कार्यक्रम व पुस्तक प्रकाशन


संभाजीनगर, दि. १६ (प्रतिनिधी)- माह्या जगन्याची ताकत या काव्यसंग्रहात माधुरी चौधरी यांनी स्त्री जाणिवा अत्यंत तरलपणे, संवेदनशीलपणे मांडल्या आहेत. त्यामुळेच त्यांच्या कवितेतील भाषा आणि आशय मनाला भावतात  असे प्रतिपादन ज्येष्ठ कवयित्री डॉ. ललिता गादगे यांनी केले. लेवा पाटीदार मित्र मंडळ व समाजाच्या वतीने आयोजित रक्तदान, गुणवंतांचा सत्कार आणि पुस्तक प्रकाशन समारंभात त्या बोलत होत्या.

 सौभाग्य मंगल कार्यालयात पार पडलेल्या या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी डॉ. दादा गोरे होते. तर पारकाशन डॉ. ललिता गादगे यांच्या हस्ते झाले. डॉ. शशिकांत पाटील, डॉ. ललित आधाने, याःनी पुस्तकावर भाष्य केले .लेखिका रसिका देशमुख यांनी सरस्वती स्तवन गाऊन कार्यक्रमाची सुरवात केली .

डॉ. गादगे पुढे म्हणाल्या की, भाषा आणि गोडवा हा या कवितेतील आशय आहे म्हणून त्या मनाला भावतात. जीवनाचा अनुभव मनात तरतला पाहिजे मग त्यातून हृदयाला भिडणारे शब्द निघतात याचा अनुभव माधुरी चौधरी यांच्या कवितेतून येतो. साक्षात जगणं त्यांनी कवितेत मांडले म्हणून कविता जिवंत झाल्या आहेत. लेवा बोलीतील गोडवा तसाच्या तसा ठेऊन कविता लिहिल्या आहेत. हे या कवितेचं यश आहे. खमक्या शब्दांत त्यांनी वाईट रुढीवर आसूड ओढले आहेत. यातून बहिनाबाईचा कणखरपणा दिसतो आहे. स्त्री जाणिवा अत्यंत अलगदपणे, तरलपणे, संवेदनशीलपणे आणि प्रभावीपणे मांडल्या आहेत. स्रियांच्या स्वातंत्र्यावर या कवयित्रिला पडलेले प्रश्न विचार करायला लावणारे आहेत.असे सांगून त्यांनी आपली 'संदुक' ही कविता सादर केली.

अध्यक्षीय भाषणात डॉ. दादा गोरे म्हणाले की, प्रगत भाषेच्या नादात आपण बोलीभाषा अडचणीत आणतो. पेशवाईनंतर मराठ्यांचे राज्य संपले. राज्याला एक भाषा असावी त्यासाठी स्थापन केलेल्या समितीत सदाशिव पेठेतील तज्ज्ञ असल्याने त्यांनी पुणेरी भाषा आपल्या माथी मारल्यामुळे बोलीभाषा मागे पडली. बोलीभाषा बोलल्यास संस्कृतीला उजाळा मिळतो. आपली नाळ संस्कृतीशी जोडलेली राहते. आजच्या बदलत्या खेड्यात यांच्या मनातील जाणे आणि अस्सल खेडे साक्षात उभे करण्याची ताकत चौधरी यांच्या कवितेत असल्याचे ते म्हणाले.

मनोगतात कवयित्री माधुरी चौधरी यांनी पुस्तकाच्या निर्मितीमागची भूमिका मांडून आपल्या दोन कविता सादर केल्या.

पुस्तकावर भाष्य करताना डॉ. शशिकांत पाटील सर म्हणाले की, खान्देश परिसरात अनेकविध भाषा बोलतात. मात्र साहित्यिकांनी आपल्या साहित्यात बोलीभाषेचा वापर केला पाहिजेत. संस्कृतीच्या माध्यमातून बोलीभाषा कवितेपर्यंत आणली आहे. सांस्कृतिक ठेव्यापासून अगदी स्वयंपाकापर्यंत सर्व गोष्टी त्यांच्या कवितांमध्ये आल्याचे ते म्हणाले.

डॉ.ललित आधाने सर म्हणाले की, खान्देशी बहिणाबाईच्या अभिव्यक्तीचा वारसा चौधरी यांनी पुढे चालवला पाहिजे. एलपीजीमुळे मराठी भाषेवर परिमाण झाला.कारण देशात दोन हजारावर भाषा बोलल्या जातात. साहित्यिकांनी बोलीभाषेत लिहिल्यास बोलीभाषा टिकतील असे ते म्हणाले.

त्यानंतर निमंत्रितांचे कविसंमेलन पार पडले. त्यात गिरीश जोशी, प्रा. पंजाबराव मोरे, विजय सानप, राज रणधीर, ज्योती सोनवणे, आशा डांगे, संदीप  ढाकणे, गणेश उदावंत, वर्षा देशमुख, पंडित वराडे यांच्या बहारदार कविता सादर  झाल्यात .

कार्यक्रमाची सुरूवात रक्तदान शिबिराचे झाली त्यावेळी  शिबिराचे उद्घाटन डॉ.राहुल तळेले यांच्या हस्ते झाले. अनेक समाजबांधवांनी रक्तदानासाठी उत्साहाने प्रतिसाद दिला . कार्यक्रमात डॉ. सर्जेराव  जिगे सर, डॉ. शिवाजी हुसे ,रसिका देशमुख मॅडम, मगर सर ,संदीप सोनवणे, राजेंद्र चव्हाण, सुनिल उबाळे दादा ,ज्ञानेश्वर कुलकर्णी सर,मृणाल देशपांडे,माधवी देवळाणकर, मंगला चौरे,हेमंत बन्सल, अजय त्रिभुवन,मगर सर, ज्ञानेश्वर काळे अनेक साहित्यिक तसेच पोलिस बॉइज असोसिएशनचे अध्यक्ष रवि वैद्य, सुनिला क्षत्रिय  लेवा मित्र मंडळाचे मधुकर सरोदे, जगन्नाथ किनगे, डी. के. कोलते, सुनील चिरमाडे, अनिता सरोदे, सिंधू पाटील, भंगाळेताई तसेच इतर समाज बांधव मोठ्या संख्येने  उपस्थित होते.
त्यानंतर गुणवंत विद्याथ्र्यांचा सत्कार सोहळा झाला त्यात माधुरी चौधरी व राजेश इंगळे यांनी मुलांना मार्गदर्शन केले.  सातवी ते बारावी पर्यंतच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान चिन्ह,प्रमाणपत्र, व गुलाबपुष्पे देऊन सन्मान करण्यात आला. सूत्रसंचालनाची धुरा कस्तुरी जोशी, निलेश चव्हाण, अनिता सरोदे यांनी यशस्वीपणे पार पाडली.


.......

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.