पंतप्रधान मोदींनी देशाला संबोधित केलं आहे. कलम ३७० हटवल्यानंतर पंतप्रधान मोदी पहिल्यांदा देशाला संबोधित केलं.यावेळी मोदींनी ३७० कलम रद्द झाल्यानंतरचं काश्मीर कसं असेल याची माहिती दिली.
नवी दिल्लीः(लेवाजगत वृत्त सेवा) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशातील १३७ कोटी जनतेशी संवाद साधला आणि जम्मू काश्मीरमधील जनतेला आश्वस्त केले की जम्मू काश्मिरात पुन्हा लवकरच निवडणुका होणार असून जनतेचे प्रतिनिधी तुम्हीच निवडणार आहात. सध्या काश्मिरात राष्ट्रपती राजवट लागू आहे. कलम ३७० हटविण्यापूर्वी केंद्र सरकारने लावण्यात आलेला कर्फ्यु अजून काढलेला नाही. त्यामुळे स्थिती सामन्य झाल्यावर पुन्हा निवडणूक होणार असल्याचे संकेत यावेळी पंतप्रधान मोदी यांनी दिले आहेत.
ते म्हणाले, यापूर्वी जसे तुमच्यातून निवडून आमदार विधानसभेवर जात होते. तसेच आमदार भविष्यात तुमच्या पसंतची आणि तुमच्यातून निवडून विधानसभेवर जाणार आहेत. जसे मुख्यमंत्री होते तसेच मुख्ममंत्री असणार आहेत. तुमच्यातून निवडून जम्मू काश्मीरमधील मुख्यमंत्री निवडला जाईल असा विश्वास पंतप्रधान मोदी यांनी काश्मीरच्या जनतेला दिला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत