Header Ads

सावद्याच्या ओम कॉलनी त नळाला पाणीच येतच नाही....! १५ अगस्टला आमरण उपोषण बसण्याचा इशारा..!

सावद्याच्या ओम कॉलनी त नळाला पाणीच येतच नाही....!
  १५ अगस्टला आमरण उपोषण बसण्याचा इशारा..!
सावदा प्रतिनिधी
 येथील ओम कॉलनी परिसरातील कमल टॉकीज मागील   रहिवाशी  माजी नागराध्यक्षया नीता शाम पाटील यांच्या सह त्यांचे परिसरात  काही रहिवाशी यांना पालिका अंतर्गत होत असलेल्या पाणीपुरवठा नळातून गेल्या एप्रिल पासून  चारमहिन्या पासून पाणी पुरवठा होतच नसल्याने पिण्याला पाणी सुद्धा मिळत नसते, योग्य नियोजन अभावी नाईलाजास्तव येत्या १५ आगस्ट २०१९  स्वातंत्र  दिनी पालिकेच्या समोरच आमरण उपोषणास बसणार असल्याचे निवेदन म्हटले आहे
 दि; ८ रोजी सकाळी ११:३० वाजता मुख्याधिकारी यांना तक्रार निवेदन दिले आहे .
       निवेदनात म्हटले आहे की ;  माजी नगराध्यक्षा नीता पाटील तसेच  त्यांचे पती माजी नगरसेवक  श्याम पाटील यांच्या सोबत  त्यांचे परिसरातील काही  अपवाद वगळता नागरिकांच्या  घरात पालिका अंतर्गत होत असलेल्या पाणी पुरवठा  गेल्या चार महिन्या पासून नळाला पाणी येतच नसल्याने  या नागरिकांना मोठ्या समस्याना तोड द्यावे लागत आहे . वेळो वेळी या नागरिकांना टँकरद्वारे  विकत पाणी घ्यावे लागत आहे .याबाबत २० ते २५ वेळा  पालिका संबधित असलेल्या नगराध्यक्षा , नगरसेवक, प्रशासकीय अधिकारी पाणीपुरवठा कर्मचारी यांच्या कडे पालिकेत जाऊन  लेखी व तोंडी तक्रार वजा निवेदने दिली . तक्रारदार यांच्या नळाला पाणी पुरोवठा होत असताना पाणी का येत नाही ? या बाबत वस्तूस्थिती वारंमवार मांडली परंतु पालिकेकडून योग्य नियोजन झालेच नाही .पालिका संबंधित उडवाउडवीची उत्तरे देऊन तक्रारदाराच्या तोंडाला पाने पुसत  असतात . तांत्रिक अडचण असल्यास  आम्ही समजू शकतो .या भागात हा अपवाद वगळता इतर ठिकाणी नळाला पाणी येत असते .नळाला पाणीच येत नसल्याने  या नागरिकांनी चार महिन्याची  पाणीपट्टी भरणार नसल्याचे निवेदनात म्हटले आहे .आज मितीस हतनूर येथील मुक्ताई  धरण उशाशी असून गडगंज पाणी वाहून जात आहे मात्र माजी नागराध्यक्षया सह नागरिक यांचा घसा कोरडाच असल्याने या रहिवाशी नागरिकांचा मोठा उद्रेक होत असून त्वरित चार महिन्याची पाणीपट्टी कमी करण्यात यावी व  नळाद्वारे पाणी पुरोवठा सुरळीत करण्यात यावा अन्यथा येत्या १५ आगस्ट २०१९  स्वातंत्रदिनी पालिकेसमोरच आमरण उपोषणास करण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे करण्यात आला असून निवेदन मुख्याधिकारी  सौरभ जोशी यांना दिले निवेदनावर   माजी नगरसेवक श्याम वसंत पाटील,  माजी नागराध्यक्षया नीता पाटील ,महेश अर्जुन पाटील,बाळू बुधो विनंते ,रुपाली विकास बावणे,स्मिता विनायक फेंगडे ,सुनीता नकुल पाटील, शोभा बाळू विनंते, शोभा अर्जुन पाटील, विनायक फेंगडे,विकास सदाशिव बावणे आदींनी सह्यानिशी दिलेल्या निवेदनात म्हटले असून माहिती साठी  निवेदनाची प्रत जिल्हा धिकारी ,पालकमंत्री गिरिष महाजन, माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे याना पाठविण्यात आल्या आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.