Contact Banner

मुंबईत उद्यापासून पहिले मराठी समाज माध्यम संमेलन
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय आणि डिजिटल मीडिया प्रेमी मंडळींचा उपक्रम

मुंबई, दि.16: ( लेवा जगत वृत्त) सामान्य जनतेच्या परिवर्तनात महत्त्वाचे योगदान देणाऱ्या समाज माध्यमांचा सकारात्मक व विधायक कार्यासाठी वापर होणे आवश्यक आहे. या समाज माध्यम वापरकर्त्यांना एकत्र आणून या विषयावर सकारात्मक सर्वांगीण चर्चा घडविण्यासाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र सायबर, राज्य मराठी विकास संस्था आणि पुण्यातील डिजिटल मीडिया प्रेमी मंडळी संस्थेच्या संयुक्त विद्यमाने उद्यापासून मुंबईत दोन दिवसीय पहिले राज्यस्तरीय ‘मराठी समाज माध्यम’ संमेलन आयोजित करण्यात आले आहे.


उद्या दि. 17 आणि 18 ऑगस्ट 2019 रोजी मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे हे संमेलन होणार असून मराठी भाषा विभागाचे मंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते सकाळी 11 वाजता संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. मराठी भाषेत व्यक्त होणाऱ्या लेखक, कवी, अभिनेते, चित्रकार, छायाचित्रकार व विचारवंतांना प्रोत्साहन देण्याचा आणि सामाजिक, भाषिक आणि कलात्मक देवाणघेवाणीतून मराठी भाषेला समृद्ध करण्याचा उद्देश या संमेलनाच्या आयोजनामागे आहे.


दोन दिवस चालणाऱ्या या संमेलनात वादविवाद, मुलाखती, करमणुकीचे कार्यक्रम, कविता वाचन, चर्चासत्रे असे अनेकविध कार्यक्रमाची रेलचेल असणार आहे.

संमेलनाची रूपरेषा पुढीलप्रमाणे…

दि. 17 ऑगस्ट 2019 (पहिला दिवस)
वेळ
कार्यक्रम
मान्यवर
11.45
सोशल मीडिया मस्त आहे
प्रसाद शिरगावकर (लेखक, कवी)
12.00
सोशल मीडियावर झालेल्या उल्लेखनीय गोष्टी
आकाश बोकमूरकर, आपत्कालीन परिस्थितीचा सामना
स्वप्निल शिंगोटे, ट्विटर संमेलन आयोजक
उन्मेष जोशी, संस्थापक रीस्पोन्सीबल नेटिझन चळवळ
डॉ. संदीप काटे, संस्थापक- सातारा हिल मॅरॅथॉन
1.30
स्टँडअप कॉमेडी
सावनी वझे, भारतीय डिजिटल पार्टी
1.45
माझी expression माझं impression
समन्वयक- यजुर्वेंद्र महाजन
सहभाग
वैशाली भागवत, सायबर वकील 
डॉ. श्रुती पानसे, संशोधक आणि सल्लागार-ब्रेन बेस्ड लर्निंग
श्रीकांत जाधव, बोल-भिडू संस्थापक
डॉ.बाळसिंग राजपूत, महाराष्ट्र सायबर
अमोल देशमुख, सायबर तज्ज्ञ
2.45
नेटवर्किंग ते मीडियम, offline ते online
हारिस शेख, संपादक, म.टा.ऑनलाईन
3.00
समाजाची दशा, दिशा आणि दिशांतरे (परिसंवाद)
समन्वयक- प्रदीप लोखंडे
सहभाग
शेफाली वैद्य, राजकीय विश्लेषक,
राजू परुळेकर, राजकीय विश्लेषक,
अशोक पानवलकर, मुख्य संपादक, महाराष्ट्र टाइम्स
आशिष दीक्षित, मुख्य संपादक, बीबीसी मराठी
सौरभ गणपत्ये, ब्लॉगर आणि इतिहास अभ्यासक

दि. 18 ऑगस्ट 2019 (दुसरा दिवस)
वेळ
कार्यक्रम
सहभाग
11.00
राज्य शासनाचा सोशल मीडियाबद्दलचा संदेश - दृष्टिकोन, धोरण, मूल्ये
अजय अंबेकर, संचालक (प्रशासन) (माहिती व जनसंपर्क महासंचालनालय)
11.15
ब्रॅंड, व्यावसायिक दृष्टिकोन आणि सोशल मीडिया (परिसंवाद)
समन्वयक- विनायक गोडसे
सहभाग
राजेश मंडलिक, व्यवस्थापकीय संचालक सेट्को इंडिया सदानंद परुळेकर, ब्रँड प्रोफेशनल
प्रदीप लोखंडे, रुरल मार्केटिंग एक्सपर्ट
दिलीप टिकले, ई-लर्निंग आणि ई-गव्हर्नन्स तज्ज्ञ
12.00
सोशल मीडियावर व्यावसायिक यश कसं मिळवायचं? (परिसंवाद)
समन्वयक- दिलीप टिकले
सहभाग
ओंकार दाभाडकर, संस्थापक ईन-मराठी.कॉम   
मधुरा बाचल, मधुरा रेसिपीज
सचिन परब, संस्थापक कोलाज.इन
अनुषा नंदकुमार, संस्थापक भाडिपा
12.30
व्हायरल होतं का, करता पण येतं? (परिसंवाद)
समन्वयक- अरविंद जगताप
सहभाग-
संजय श्रीधर, संस्थापक खासरे टी व्ही (यु ट्युब)
पंकज जैन, संचालक होक्सस्ल्येयर.कॉम
अमोल देशमुख, सायबर तज्ज्ञ
गणेश मतकरी, लेखक आणि विश्लेषक
2.00
मनोरंजन कार्यक्रम
गावाकडच्या गोष्टी (कोरी पाटी प्रोडक्शन)
2.45
मला व्यक्त होताना असणार्‍या चिंता, त्यावरील उपाय आणि माझ्या अपेक्षा (परिसंवाद)
समन्वयक- प्रसाद शिरगावकर
सहभाग-
कौशल इनामदार, मराठी संगीतकार
राजेश मंडलिक, व्यवस्थापकीय संचालक सेट्को इंडिया
गौरी ब्रह्मे, सोशल मीडिया लेखक
सारंग साठ्ये, संस्थापक भाडिपा
3.30
लघुनाट्य: गूगल विरुद्ध लेक्सा
-
3.45
व्यक्त होणं सोपं करण्यासाठी टूल्स आणि टेक्निक्स (परिसंवाद)
विनायक गोडसे, DSCI                     
अनिरुद्ध जोशी, स्वरचक्र टंकलेखन निर्माता
शेखर पाटील, सोशल मीडिया लेखक
4.15
सोशल मीडियाची भाषा: प्रमाण भाषा की… (परिसंवाद)
समन्वयक- संग्राम खोपडे, रेडीओ जॉकी
सहभाग-
मयुरेश कोन्नुर, पत्रकार बीबीसी मराठी         
सौरभ पाटील, संस्थापक बोल-भिडू
आनंद काटीकर, राज्य मराठी विकास संस्था
5.00
सोशल मीडियामुळे मिळालेले नाविन्यपूर्ण कलाविष्कार आणि संधी… (परिसंवाद)
समन्वयक- सारंग साठ्ये
सहभाग-
सनत लडकत, संस्थापक बाबा मीमवाले     
अमृत देशमुख, संस्थापक बुकलेट गाय
अजित शेळके, rapboss

या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.