Contact Banner

फैजपुर येथे उद्या बारागाड़ी उत्सव

फैजपुर
फैजपुर येथे दक्षिण बाहेरपेठ भागातील पुरातन काळातील मरीमातेचे जागृत देवस्थान असून यात्रोत्सव निमित्त सालाबाद प्रमाणे दि १३ रोजी सायंकाळी सहा वाजता फैजपूर शहरात परंपरागत पद्धतीने बारागाड्या भगत संजय सेवकराम कोल्हे हे ओढतील.

यावेळी बारागाड्या ओढण्यासाठी असंख्य भक्तगणांची साथ लाभणार आहे. बारागाड्या शहरातील अंकलेश्वर ब-हाणपूर मार्गावरील म्युनिसिपल हायस्कूल ते सुभाष चौक पर्यंत ओढल्या जातात. यावेळी पोलीस प्रशासन सज्ज असते. मरीमातेचा परिसर नगरसेवक प्रभाकर सपकाळे यांनी पेव्हरब्लॉक दलित वस्ती निधीतून बसवण्यात मोठा हातभार लावला आहे. लवकरच सभामंडप उभारण्यात येणार असल्याचे प्रभाकर सपकाळे यांनी सांगितले. मरीमातेच्या जयघोषाने भक्तांचा मळा फुलणार आहे. पुरातन काळात फैजपूर गावात कॉलरा ची साथ व इतर संकटे आली होती मरिमातेच्या चरणी पार्थना करून त्याकाळी नाहीसे झाली. तेव्हा पासून बारागाड्या ओढण्याची परंपरा आजही कायम आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.