Contact Banner

मुकेश अंबानी यांची घोषणा

  रिलायन्स'नं केली 'जिओ फायबर'ची घोषणा
लेवाजगत वृत्त
 रिलायन्स इंडस्ट्रीज लिमेटेड समूहाच्या आयोजित बैठकीत मुकेश अंबानी यांची घोषणा

 *या दिवशी होणार लॉंच?* : जिओच्या लॉंचिंगच्या तिसऱ्या वर्धापनदिनी म्हणजेच येत्या 5 सप्टेंबरपासून जिओ फायबर लाँच होणार आहे. यात इंटरनेट प्लान्स अगदी 700 रुपयांपासून ते 10 हजार रुपयांपर्यंतच्या दरात मिळणार आहेत.

 *अंबानी म्हणाले...* : जियोने सध्या 50 लाख घरांमध्ये गिगाफायबर सेवा पोहेचवली आहे. याचसोबत भारतातील 1600 शहरांमध्ये ही सेवा सुरु केली जाणार आहे. 

 *काय आहेत जिओफायबरची वैशिष्ट्ये?*
▪ जिओ ब्रॉडब्रँड सेवेचा स्पीड 100 एमबीपीएसपासून सुरू होणार असून तो 1 जीबीपीएसपर्यंत असणार आहे.
▪ जीओ गिगाफायबरवर इंटरनेट ऑफ थिंग्ज म्हणजेच केबल टीव्ही, व्हॉइस कॉलिंग आणि रिलिजच्या दिवशी काही ▪ चित्रपट पहाण्याची सुविधा प्रिमिअम जिओ फायबर ग्राहकांना मिळणार आहे
▪ जिओची ही सिनेमाची फर्स्ट डे फर्स्ट शो योजना 2020 च्या मध्यापासून सुरू होणार
▪ मिक्स्ड रिअॅलिटी (AR+VR)जिओ गिगाफायबरवर उपलब्ध होणार
▪ वार्षिक वेलकम ऑफरसोबत मिळणार 4D/4K टीव्ही आणि 4K सेट टॉप बॉक्स मोफत
▪ 50 लाख घरांमध्ये याआधीच प्रायोगिक तत्वावर सुरू आहे जिओ गिगाफायबर
▪ आता 1 अब्ज घरांना जिओ इंटरनेट ऑफ थिंग्ज (IoT) ने कनेक्ट करण्याचं रिलायन्सचं लक्ष्य
▪ जिओ जगातली दुसरी मोठी टेलिकॉम ऑपरेटर सेवा बनली आहे.

1 टिप्पणी:

Blogger द्वारे प्रायोजित.