Contact Banner

शहरातील मैत्रिसागर बुद्ध विहार व क्रांतीज्योति सावित्रीआई फूले अभ्यासीके तर्फे  गरजुंना धान्य वाटप ; मदतीचा ओघ सुरु ;
     फैजपूर (प्रतिनिधी,फारुख शेख )-
कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्याकरीता देशात लॉकडाऊन सुरु आहे यामुळे हातमजूर व गोरगरीब यांचे हाताला काम नाही म्हणून अश्या गरजुंची मदत करण्याकरीता
येथील मैत्रिसागर बुद्ध विहार शिवाजी नगर  व क्रांतीज्योति सावित्रीआई फूले अभ्यासीका (scan) यांच्यावतीने एक हात मदतीचा म्हणून शहरातील शिवाजीनगर व झेड टी एस भागातील गरीब व गरजू एकूण ९५ कुटुंबांना अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तु  वितरित करण्यात आले.
     यात शिवाजीनगर व झेड टी एस भागातील गरजू नागरिकांना १७ एप्रिलपासून  मदत करण्यात येत आहे .
 गेल्या तीन दिवसांपासून किमान ३० कुटुंबाना धान्य व जीवनावश्यक वस्तु वाटप करण्यात आली असून  याकामासाठी स्कैनचे (scan) नवीन पाटील सर आणि  संगीता राजेंद्र भामरे, यांचे अनमोल सहकार्य लाभले .
या कामी, एस बी रामटेके सर ,  झोम्बाडे सर . तुषार मोरे , प्रमोद निळे , सोनू काझी व अरविंद बाविस्कर आदीं परिश्रम घेत आहे .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.