Contact Banner

सावद्यात २२नागरिकांचा अहवाल निगेटिव्ह तर २पॉझिटिव्ह

सावद्यातीळ २२संशयितांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने   मोठा दिलासा तर दोन पॉझिटिव्ह आल्याने पॉझिटिव्ह संख्या ८
सावदा प्रतिनिधी गेल्या नऊ दिवसां पूर्वी कोरोनाने  प्रवेश केला त्यावेळी पॉझिटिव्ह आलेल्या   ५५ वर्षीय पुरुष व  ६०वर्षीय महिलेच्या संपर्कातील क्वारान्टीन केलेल्या संशयित नागरिकांचे स्वाब दि २२रोजी घेण्यात आले होते ' त्यातील  काल दि २६ रोजी रात्री उशिरा आलेल्या  दोन  ३० व ५० वर्षीय पुरुषांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता त्या घेतलेल्या स्वाब मधील  २२ व्यक्तींचा अहवाल निगेटिव्ह आल्याने गांधी चौक,शिवाजी चौक ,स्टेशन नाका परिसरा सह  शहरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.अजून काही अहवाल आज येण्याची शक्यता आहे.काल आढळलेले पॉझिटिव्ह रुग्ण मस्कावद सिम व थोरगव्हाण येथील डॉक्टर आहेत्या मुळे सावदा येथे रुग्ण संख्या ८ झाली आहे
भडगाव, पारोळा, धरणगाव येथील 47 अहवाल प्राप्त. 45 अहवाल निगेटिव्ह तर 2 अहवाल पाॅझिटिव्ह आले आहेत. 
  आज दि २७ रोजी पाॅझिटिव्ह आढळलेल्या व्यक्ती मध्ये वडजी, भडगाव येथील एक तर धरणगावच्या एका व्यक्तीचा समावेश आहे.
जळगाव जिल्ह्यात कोरोना बाधित रूग्णांची संख्या 501 झाली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.