सावद्यात शारदा चौकात पुन्हा एक पॉझिटिव
सावदा(लेवाजगत न्यूज):- सावद्यातिल शारदा चौक परिसरात एक 55 वर्षीय पुरुष रिपोर्ट पॉझीटिव आला आहे. शहरातील शारदा चौकातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दोन झाली असून सावदा शहरात एकूण रुग्ण संख्या आठ झाली आहे आहे त्यामुळे सावदा शहरात खळबळ उडाली असून नागरिक वाढत असलेल्या रूग्ण संख्येने संभ्रमात पडले आहे तरी नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून घराबाहेर पडू नये व विनाकारण ठेवू नये असे आवाहन मुख्याधिकारी सौरभ जोशी व सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांनी केले आहे हे शारदा चौक परिसर आधीच कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर असून या पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींना विलगीकरण कक्षात आणण्याची प्रक्रिया सुरू *जळगाव जिल्ह्यात आज आणखी 29 कोरोना बाधित रुग्ण आढळले*
तसेच भडगाव, नशीराबाद, चोपडा, सावदा, भुसावळ, जळगाव येथील 149 कोरोना संशयित व्यक्तींचे तपासणी अहवाल प्राप्त. 120 अहवाल निगेटिव्ह आले आहे तर 29 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तीमध्ये भडगावचे चार, चोपडा, सावदा, भुसावळ, उमाळा, विटनेर येथील प्रत्येकी एक तर जळगाव शहरातील जखनीनगर, तांबापुरा, सलगार नगर व इतर भागातील वीस व्यक्तींचा समावेश आहे.
जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या 557 झाली आहे. अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत