भुसावळ येथे ''जीवनदान'' अभियानाचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते उद्घाटन
भुसावळ:-(लेवाजगत न्यूज)- मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या रक्तदान आवश्यकतेच्या आवाहनाला साथ देत जिह्यातील कोरोना प्रादुर्भाव, सद्यस्थितीतील रक्ताची उपलब्धता आणि संभाव्य गरज याची तयारी म्हणून शिवसेना जिल्हा प्रमुख व आमदार चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली भुसावळ तालुका शिवसेना पदाधिकार्यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका संघटक प्रा.धीरज पाटील यांच्या संकल्पनेतून व शुभम सोनार यांच्या सहकार्याने रक्तदानासाठी http://www.jivandaan.in हे संकेतस्थळ व jivandaan अॅप विकसीत केले आहे. या संकेतस्थळाचे उद्घाटन जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याहस्ते करण्यात आले व जीवनदान अभियानाची सुरुवात करण्यात आली. प्रसंगी जळगावचे आमदार राजुमामा भोळे, रक्तदानाचे विक्रमवीर मुकुंद गोसावी, भुसावळ शहरप्रमुख बबलू बर्हाटे, जिल्हा परीषदेचे माजी सदस्य विश्वनाथ पाटील उपस्थित होते.
पालकमंत्र्यांनी केले कौतुक
शिवसेनां कार्यकर्ते जनसेवेसाठी नेहमीच तत्परतेने कार्य करीत असतात. एखाद्या व्यक्तीला रक्ताची गरज असल्यास आणि तिला वेळेवर रक्त मिळाल्यास त्या व्यक्तीचे प्राण वाचवण्याचे कौतुकास्पद व महत्त्वपूर्ण कार्य या माध्यमातून केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत