LockDown 5.0 : देशभरात लॉकडाऊन 30 जूनपर्यंत वाढवला; लॉकडाऊन कंटेनमेंट झोनपुरता मर्यादित*_
📣 _*LockDown 5.0 : देशभरात लॉकडाऊन 30 जूनपर्यंत वाढवला; लॉकडाऊन कंटेनमेंट झोनपुरता मर्यादित*_
🔐 _देशातला लॉकडाऊन 30 जूनपर्यंत वाढल्याची घोषणा केंद्र सरकारने केली आहे. लॉकडाऊन 5.0 हा फक्त कंटेनमेंट झोनपुरताच मर्यादित आहे. कंटेनमेंट झोनबाहेरील निर्बंध टप्प्याटप्याने कमी होणार आहे. महत्त्वाचं म्हणजे कटेंनमेंट झोन वगळता 8 जूननंतर अटींसह धार्मिक स्थळे, हॉटेल रेस्टॉरंट, शॉपिंग मॉल टप्प्याटप्यानं सुरु होणार आहेत._
🚷 _कर्फ्युची वेळ कमी करण्यात आली आहे. रात्री 9 वाजेपासून सकाळी 5 वाजेपर्यंत कर्फ्यु असणार आहे. शाळा, कॉलेज शैक्षणिक वर्ष सुरु करण्याबाबतचा निर्णय जुलै महिन्यात घेतला आहे. सर्व पडताळून केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या मार्गदर्शनानुसार याबाबत निर्णय घेतला जाणार आहे._
*लॉकडाऊन ५.० : काय सुरु, काय बंद*
नवी दिल्ली : देशात लॉकडाऊन 30 जूनपर्यंत वाढवण्यात आला आहे. लॉकडाऊन 5 बाबतच्या गाईडलाईन्स जारी करण्यात आल्या आहेत. लॉकडाऊन तीन टप्प्यांमध्ये असणार आहे. ग्रीन, रेड आणि ऑरेंज झोन रद्द करुन त्याऐवजी कंटेन्मेंट हा एकच झोन असणार आहे. लॉकडाऊन 5.0चं नाव अनलॉक-1 असं असणार आहे. लोकांना मास्क लावणं आवश्यक असणार आहे.
गृह मंत्रालयकडून जारी करण्यात आलेल्या गाईडलाईन्सनुसार, संपूर्ण देशात रात्री 9 ते सकाळी 5 वाजेपर्यंत कर्फ्यू असणार असून या काळात बाहेर फिरण्यावर बंदी असणार आहे.
*लॉकडाऊन 5.0मध्ये काय सुरु राहणार -*
- 8 जूनपासून हॉटेल, मॉल सुरु होणार
- एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाण्यासाठी कोणत्याही पासची आवश्यकता नाही
- दुसऱ्या टप्प्यात शाळा, महाविद्यालयं सुरु करण्याबाबतचा निर्णय राज्य सरकारचा असणार
- देशभरात कुठेही जाण्या-येण्यावर बंदी नाही
*लॉकडाऊन 5.0मध्ये काय बंद राहणार -*
- दिल्ली मेट्रो सध्या सुरु होणार नाही
- रात्री 9 ते सकाळी 5पर्यंत कर्फ्यू जारी
- परदेश प्रवास, आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर बंदी
- अंत्यसंस्कारासाठी केवळ 20 लोकांच्या उपस्थितीसाठी परवानगी
- दुकानांमध्ये एकावेळी केवळ 5 लोक खरेदी करु शकतात
- चित्रपटगृह, जिम, स्विमिंग पूल बंद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत