सावद्यात बुधवारपेठ भागात मयत पुरुष पॉझिटिव्ह,सावदा@१७,जिल्ह्यात ७४४
सावद्यात बुधवारपेठ भागात मयत पुरुष पॉझिटिव्ह
सावदा लेवाजगत वृत्त( ३१);- आज दुपारी पुन्हा आलेल्या कोरोना बधित रुग्णांच्या अहवालात सावद्यात १रुग्णांची भर पडली असुन सदरील रुग्ण बुधवार पेठ परिसर स्वामी विवेकानंद चौक ८८ वर्षीय मयत पुरुष आहे ,गांधी चौक परिसरातील आधी पॉझिटिव्ह आढळलेल्या पुरुष रुग्णांचा दुसऱ्यांदा घेतलेला अवहवाल पुन्हा पॉझिटिव्ह आला आहे, यामुळे सावदा शहरात प्रचंड भितीचे वातावरण पसरले आहे. आता शहरातील चिंता पुन्हा वाढली आहे. बुधवार पेठ , ख्वाजा नगर ,या परिसरातही कोरोनाने शिरकाव केला आहे. सदरील घटनेने परिसराच्या व सावदा वासीयांना पुन्हा धक्का वर धक्के बसत आहे. त्यामुळे खळबळ उडाली असून रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींना कॉरटाईन करण्यास प्रशासनाने सुरुवात केली आहे.
आज पर्यंत गांधी चौक, स्टेशन नाका,संभाजी चौक,तडवी वाडा, शारदा चौक,महानुभाव मठ परिसर,ख्वाजा नगर,बुधावरपेठ हे भाग सील प्रशासनाने सील केले असून कंटेमेंट झोन जाहीर केले आहे.
तरी सावदा वासीय नागरिकांना अजून कोरोनाचे गांभीर्य लक्षात येत नसून कंटेमेंट झोन मधील नागरिक बाहेर फिरताना दिसत आहे ,प्रशासन समजावून सांगत असून सुद्धा काही महाभाग झोनच्या बाहेर फिरायला येतात व तोंडाला मास्क न लावता फिरत असल्याचे निदर्शनात येत आहे ,
नागरिकांनी स्वतःची सुरक्षे करीत तरी आणि आपल्या कुटुंबाच्या हीता करीत शासनाचे नियम पाळावे.
जळगाव जिल्ह्यात आणखी ४५ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले
जळगाव जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या वाढतच असून काल एकूण ५५ आणि नंतर २३ रुग्ण आढळले होते . *आज पुन्हा रविवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास ४५ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत* . त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाग्रस्त *रुग्नांची संख्या ७४४ झाली* असून आतापर्यंत *७७ जणांचा मृत्यू झाला आहे*. यात *धरणगाव ३ , भुसावळ १२ ,जळगाव १२ , अमळनेर ५ ,पाचोरा २, यावल ४ ,चोपडा १, जामनेर २ ,सावदा २, रावेर १ अशा पॉझिटिव्ह* रुग्णांचा समावेश असल्याची माहिती दुपारी सूत्रांनी दिली. संशयित व्यक्तीचे तपासणी अहवाल *४५ पाॅझिटिव्ह आले आहेत.* पाॅझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तीमध्ये जिल्ह्यात कोरोना बाधित रूग्णांची संख्या ७४४ इतकी झाली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत