मेडिकल परीक्षा 16 जुलैपासून तात्पुरते वेळापत्रक जाहिर
नाशिक:
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विधापीठाच्या विविध विद्या शाखांच्या उन्हाळी सत्रातील अंतिम वर्ष अभ्यासक्रमाच्या लेखी परीक्षा 16 जुलैपासुन घेण्यात येणार आहेत . विद्यापीठाकडून तात्पुरत्या स्वरूपाचे वेळापत्रक जाहिर करण्यात आले आहे. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता शासनाच्या सूचनेनुसार अंतिम वेळापत्रक विद्यापीठाच्या www.muhs.ac.in संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे, अशी माहिती विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डाॅ. अजित पाठक यांनी दिली.
मुंबई :
आयसीएसई बोर्डाच्या परीक्षेला परवानगी नाहिच
कोरोना प्रादुर्भावामुळे इंडियन स्कूल प्रमाणपत्र परीक्षा बोर्डास (आयसीएसई) 2 जुलैपासुन दहावी आणि बारावीची परीक्षा घेण्यास परवानगी देता येणार नाही, अशी माहिती राज्य शासनाने बुधवारी मुंबई उच्च न्यायालयात दिली.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत