शिवसैनिकांची जिल्हा बंदची हाक मुक्ताईनगरात रणनीती,४ जुलैला राहणार जिल्हा बंद
(भुसावळ प्रतिनिधि)
वरणगाव येथील राज्य राखीव पोलीस दल केंद्र 1995 पासून मंजूर होते. सत्तेचे भागीदार व दीर्घकाळ आमदार असलेल्यांना ते पूर्वत्वाकडे नेता आले नाही. तेच आता सत्तेतील आमदारांची पत व प्रतिष्ठा काढत आहे ,असा टोला शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आमदार चंद्रकांत पाटील यांनी भाजप नेते एकनाथ खडसे यांना लागावला. तसेच अहमदनगर जिल्ह्यात वळवलेल्या हे केंद्र पुन्हा वरणगावात यावे यासाठी सत्तेचे असूनही शिवसेना 4 जुलैला जिल्हा बंद करेल, असा इशारा दिला. मुक्ताईनगरात शनिवारी शिवसेना पदाधिकार्यांची तातडीची बैठक झाली. त्यात वरणगाव येथील पोलीस प्रशिक्षक प्रशिक्षण केंद्र अहमदनगर जिल्ह्यात हलवण्याच्या मुद्दा चर्चेत आला. हे केंद्र पुन्हा वरणगावात आणण्यासाठी शिवसैनिक पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना निवेदन देतील .मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे हट्ट धरू. तरीही पुढील शनिवारपर्यंत निर्णय न झाल्यास आम्ही जिल्हा बंद आंदोलन करणार आहेत, असे बैठकीत ठरले. जिल्ह्यातून कोणताही प्रकल्प बाहेर जाऊ नये ,ही आमची भूमिका आहे. मात्र दोन वेळा भूमिपूजन व मोठ्या कालावधीत आमदार असून हा प्रकल्प का पूर्ण करू शकले नाहीत असा सवाल त्यांनी खडसेंचा नामोल्लेख टाळून केला. उपजिल्हाप्रमुख प्रल्हाद महाजन, जामनेरचे मनोहर पाटील ,वरणगाव येथील उपजिल्हा संघटक विशाल मुळे, भुसावळ तालुकाप्रमुख समाधान महाजन, संतोष सोनवणे,प्रा. धीरज पाटील, छोटूभाई, गजानन खोडके, मुक्ताईनगर शहर प्रमुख गणेश टोंगे,बोडवडचे गटलू बडगुजर, अफसर खान आदी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत