सावदा येथे आ.चंद्रकांत पाटील यांचे प्रयत्नाने कॉन्टेंटमेन झोन मधून सूट । शेतकऱ्यांना दिलासा
सावदा (प्रतिनिधिनी) - सावदा येथे गेल्या में महिन्याचे मध्यात कोरोनाचे पेशेन्ट आढळून आल्याने येथील गांधी चौक, संभाजी चौक सह इतर बराच परिसर कॉन्टेंटमेन झोन म्हणून सील करण्यात आला होता,याच भागात जिल्हा बँक व सहकारी दूध डेरी असून अंसख्य शेतकऱ्यांना यथेच काम पड़त असते मात्र गत एक ते डीड महिन्या पासुन हा भाग सील असल्याने शेतकऱ्यांनची अनेक महत्वपूर्ण कामे एन पेरणीच्या तोंडावर अडकली होती,त्यामुळे हा भाग लवकर मोकळा करावा,अशी मागणी गेल्या अनेक दिवसा पासुन होत होती मात्र प्रशासना कडून याविषयी सकारत्मक हालचाली होताना दिसत नव्हत्या
अखेर आ.चंद्रकांत पाटील यांचे काना पर्यन्त ही अडचन पोहचल्यावर त्यानी तात्काळ याविषयी अधिकारीवर्गाशी बोलने केले व यातून मार्ग कसा काढ़ता येईल यावर चर्चा केली. व शेवटी दी.22 रोजी याबाबत सकारत्मक निर्णय घेण्यात आला व जिल्हा बैंक व दूध डेरी असणारा परिसरातील सील केलेला काही भाग मोकळा करण्यात आला असून यामुळे शेतकऱ्यांनची अनेक अडकलेली कामे मार्गी लागणार आहे, हा भाग मोकळा करतांना मुख्याधिकारी सौरभ जोशी, नगरसेवक राजेंद्र चौधरी, फिरोज खान पठान, युवासेना सरचीटणिस सूरज परदेशी, आदी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत