महाविद्यालयीन एटिकेटी व बॅकलॉग परीक्षा कोरोना महामारीमुळे सरसकत रद्द व्हाव्या; विद्यार्थी सेनेची मागणी.
महाविद्यालयीन एटिकेटी व बॅकलॉग परीक्षा कोरोना महामारीमुळे सरसकत रद्द व्हाव्या; विद्यार्थी सेनेची मागणी.
सावदा ( प्रतिनिधी )
कोरोना महामारीमुळे सर्वत्र भीषण परिस्थिति उधभावलेली आहे .आणि अश्या काळात परीक्षा घेणे म्हणजे कोरोनाला आमंत्रित करणे असे आहेत.मा.मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी प्रथम, द्वितीय ,तृतीय वर्ष असे परीक्षा रद्द करण्याचा घेतलेला निर्णय आम्हा सर्व विद्यार्थी वर्गाला मान्य आहेत,तरी ए टि के टी आणि बॅकलॉग असलेल्या विद्यार्थ्याच्या परीक्षा बाबत संभ्रम होता.परंतु माननीय राज्यपाल यांनी मुख्यमंत्र्यांनी घेतलेला निर्णय मागे घ्यावा अशा सूचना दिल्या आहेत .त्यामुळे विद्यार्थी व पालक यांच्यामध्ये प्रचंड गोंधळ निर्माण झाला असून परीक्षेच्या बाबतीत शंकाकुशंका निर्माण होत आहेत .विद्यार्थ्यांच्या जीवाला जर कोरोनाने गाठले तर त्याची जबाबदारी राज्यपाल महोदय घेतील का.?,जे मुलं वसतिगृहात राहतात त्यांचे नोट्स आणि पुस्तक रूमवर आहेत आणि ज्या मोठ्या विषयांचा अभ्यास करणे ऑनलाईन शक्य नाही ,ज्या मुलांचे आई-वडील हात मजुरी करून त्यांना शिकवत आहे त्यांच्या शिक्षणात पुढे निर्भय राहतील,अशा मुलांचा जीव धोक्यात टाकन गुन्हाच म्हणता येईल त्या आई बाबाच चे भविष्य काय त्यांनी कोणाकड़े बघाव आणि आजच्या परिस्थितित प्रत्येकाच्या घरात कोनीना कोनी आजारी वृद्ध वक्ति आहे ज्यांना लगेच बाधा होण्याचे संभव आहे.,जर परीक्षा घेणार असणार बाहेरगावचे विद्यार्थी परीक्षा केंद्रावर कसे पोहोचणार आणि जर पोहोचले तरी पण त्यांच्या राज्याचे जेवणाचे अभ्यासाची सोय कोठे व कसे होणार, रूम मालक आणि होस्टेललचे लोक रूम देणार नाही तर विद्यार्थी हे सर्व कस मैनेज करणार आणि विद्यार्थ्यांच्या आरोग्यबद्दल सरकार काय उत्तर देणार.,आम्ही जळगाव जिल्ह्यातील विद्यार्थी यांनी निवेदन देण्याचे एकमेव कारण जळगाव जिल्ह्यातील वाढती रुग्ण संख्या असून जिल्हा हॉट स्पॉट आहे ,रुग्णसंख्या
आजवर रितसर परीक्षा देण्यासाठी आम्ही सक्षम होतो परिक्षेला घाबरुन नाही तर स्वतःच आणि परिवाराच्या भविष्याची काळजी म्हणून अश्या मागण्या विद्यार्थ्याच्या आहेत,
तरी मा आमदार चंद्रकांत पाटील साहेब आम्हा सर्व विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून त्वरित यथा योग्य निर्णय घ्यावा अशी रास्त मागणी विध्यार्थी संघटनेचे सदस्य अभय पाटील,यश पाटील,आकाश महाजन,भूषण जाधव यांनी लेखीपत्रा द्वारे आमदार चंद्रकांत पाटील व आमदार शिरीष चौधरी यांना केली आहे.
आमदार चंद्रकांत पाटील यांनी सांगितले की मी जिल्ह्यभरात स्वाक्षरी अभियान राबवणार आहेत,मुख्यमंत्री उद्धव साहेब यांना देखील ऑनलाइन पद्धतीने पत्र देणार आहे व विद्यार्थ्यांनी घाबरून जाऊ नये महाआघाडी
विद्यार्थ्यांच्या हिताचाच निर्णय घेईल असेही आमदार चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत