जळगांव -शोध घेऊन दोषींवर योग्य ती कारवाई करण्यात यावी:-अ.भा. लेवा विकास महासंघाची मागणी
जळगांव -शोध घेऊन दोषींवर योग्य ती कारवाई करण्यात यावी:-अ.भा. लेवा विकास महासंघाची मागणी
जिल्हा सामान्य रुग्णालय जळगाव येथे गेल्या आठवड्यात शौचालयामध्ये मृत अवस्थेत सापडलेल्या पॉझिटिव्ह आजीच्या मृत्यूनंतर जिल्हा प्रशासनाच्या वतीने संबंधितांवर मोठ्या प्रमाणावर निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे. जळगांव सामान्य रुग्णालयातील कार्यवाहिचा शोध घेऊन दोषींवर योग्य ती कारवाई करण्यात यावी:-अ.भा. लेवा विकास महासंघानी मागणी केली आहे
सकृतदर्शनी ही कारवाई जरी योग्य वाटत असली तरी याचा तटस्थपणे विचार केला असता असे लक्षात येते की या संपूर्ण प्रकरणामध्ये निलंबित डॉक्टरांचा उपचाराव्यतिरिक्त सहभाग निश्चितच नाही. डॉक्टरांनी आपल्या नियमित तपासणी राऊंडमध्ये ती आजी तिच्या बेडवर नसल्याचे लक्षात आणून दिले होते. अशा वेळेला ती आजी गायब असल्याची तक्रार पोलिसांनादेखील करण्यात आली होती.या प्रकरणाची तात्काळ गंभीर दखल घेऊन रुग्णालयाच्या आवारात आजीची शोधाशोध करणे गरजेचे होते. मात्र ती आजी शौचालयामध्ये डॉ.किरण पाटील यांना मृतावस्थेत आढळून आली. संबंधित प्रकरणामध्ये डॉक्टरांचा उपचाराव्यतिरिक्त काहीही संबंध नसताना त्यांना हकनाहक गोवण्यात आले असून त्यांच्यावर निलंबनाची अमानवीय कारवाई करण्यात आलेली आहे. आम्ही वेळोवेळी कोविड रुग्णांना देण्यात येत असलेल्या उपचारासंदर्भात डॉ.किरण पाटील व इतर डॉक्टरांशी संपर्क साधला असता रुग्णांना चांगल्याप्रकारे रुग्णसेवा देण्यात आली आहे. शौचालय तपासणी करणे ही डॉक्टरांची जबाबदारी निश्चितच नाही.आठ दिवस होऊनही संबंधित शौचालयांची नियमित तपासणी, स्वच्छता का करण्यात आलेली नाही याच्या मुळाशी जाऊन संबंधित प्रकरणाचा शोध घेणे अत्यावश्यक आहे. सदर शोध घेऊन दोषींवर ती योग्य ती कारवाई करण्यात यावी व कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाचा विचार करता अशा डॉक्टरांना निलंबित न करता कोरोना नियंत्रणासाठी त्यांच्या वैद्यकीय सेवेची गरज असताना त्यांच्यावर करण्यात आलेल्या निलंबनाचा आदेश तात्काळ मागे घ्यावा.
अशी विनंती अ.भा. लेवा विकास महासंघाच्या वतीने श्री.विष्णूभाऊ भंगाळे, सर्वश्री.ललित महाजन, राजू वारके,बिपीन झोपे, महेंद्र पाटील प्रा.सुरेश अत्तरदे, प्रा.अतुल इंगळे प्रा.निलेश पाटील प्रा.निलेश चौधरी प्रा.योगेश महाजन, सचिन महाजन सर,प्रफुल्ल सरोदे सर विकी काळे, चेतन पाटील
यांनी केली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत