Contact Banner

कोरोना वाढवतोय चिंता चिनावलकारांची पुन्हा 5 रुग्णांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह

कोरोना वाढवतोय चिंता चिनावलकारांची पुन्हा 5 रुग्णांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह
चिनावल प्रतिनिधी  
फैजपूर शहरात आज सकाळी चार जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह व चिनावल तालुका रावेर  गावात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र दिसतं आहे. आज सकाळी  आलेल्या अहवालात गावातील एकाच परिवारातील५ रुग्ण पॉझिटिव्ह आढळुन आल्याचे निष्पन्न झाले आहे.
आलेल्या कोरोना तपासणी अहवालात चिनावल गावातील दोन महिला २५ वर्षीय, २८ वर्षीय तर दोन मुले १५ वर्षीय, ८ वर्षीय असुन एका ३८ वर्षीय पुरुष रुग्णांचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्हआढळून आला आहे. सदरील रुग्णांच्या घरातील वृद्ध महिला आधीच कोरोना बाधित आढळून आली आहे. आता पुन्हा पाच अहवाल पॉझिटिव्ह  आढळून आल्याने गावात चिंतेचे वातावरण आहे. सदरील सर्व रुग्ण चिंचवाडा परिसरातील रहिवासी आहे. त्यांच्या संपर्कातील व्यक्तींना कॉरटाइन करण्यात येत असुन सदरील वृत्ताने परिसरात चिंता व्यक्त होत आहे. सदरील वृत्तास स्थानिक प्रशासनाने दुजोरा दिला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.