Header Ads

Header ADS

बाप रे...फैजपूरात एकाच कुटुंबातील ३ जण कोरोना पॉझिटिव्ह.

बाप रे... : फैजपूरात एकाच कुटुंबातील ३ जण कोरोना पॉझिटिव्ह.

(फैजपूर प्रतिनिधी) फैजपुर येथील दक्षिण बाहरपेठ पुन्हा आज ३ एकाच परिवारातील नागरिकांना कोविड १९ ने संक्रमित झाल्याचा रिपोर्ट जिल्हा प्रशासनाकडून सकाळी न.पा.
प्रशासनास प्राप्त झाले आहे.त्यामुळे या रुग्णांचे संपर्कात आलेल्या व्यक्तीचा शोध कार्याने वेग घेतला आहे.
फैजपूर कोविड केअर सेंटर येथून एकूण 103 करोना रुग्ण रोगमुक्त आतापर्यंत झाले आहेत..हे सर्व शक्य झाले आहे ते तेथील डॉक्टर,नर्स,फार्मसिस्ट, सफाई कर्मचारी,शिपाई,आंबूलन्स ड्रायव्हर यांनी  घेतलेली रुग्णाची अविरत काळजी यामुळेच..तसेच या ठिकाणी ज्या रूग्णांना आवश्यक आहे त्यांना रेफर केल्यामुळे 50 पेक्षा जास्त रुग्णांचे प्राण हे केवळ येथील डॉक्टर यांनी समायसुचिकता दाखवल्यामुळे वाचले आहेत..या सेन्टर मध्ये ICMR मार्गदर्शक सूचना प्रमाणे औषध उपचार केला जातो..खोट्या बाबीवर विश्वास ठेवू नये असे डॉ.अजित थोरबोले यांनी सांगितले.
फैजपुर कोविड सेंटर येथे पालकमत्र्यांची भेट
फैजपूर कोरोना कोव्हीड सेंटरला सोमवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी भेट दिली यावेळी आ.शिरीष चौधरी, आ. चंद्रकांत पाटील त्यांच्या सोबत होते.जळगाव पालकमंत्री गुलाबराव पाटील,मुक्ताईनगर आमदार चंद्रकांत पाटील,रावेर मचे आमदार शिरीष चौधरी यांनी थेट रुग्णासोबत संवाद साधला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.