हतनुर धरणाचे २६ दरवाजे उघडले
सावदा प्रतिनिधी:-
जळगाव जिल्ह्यातील सर्वात मोठ्या आणि जिल्ह्यासाठी सिंचन व बिगर सिंचनाच्या क्षेत्रातील महत्त्वाच्या अशा हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दि-२७/०६/२०२० दिवसभरात दमदार पाऊस झाल्याने आज रात्री ९ वाजेला हतनूर धरणाचे २६ दरवाजे अर्ध्या मीटरने उघडण्यात आलेले असून त्यातून २३८७६ क्युसेक्स इतक्या प्रचंड प्रमाणात पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सोडण्यात येत आहे . त्यामुळे तापी नदी दुथळी भरून वाहत असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे.तसेच आज धरणाची जलपातळी २०९.६७० मीटर पर्यंत पोहचलेली असून धरणात आज रोजी १८४.१० दशलक्ष घनमीटर इतका जलसाठा शिल्लक आहे. लाॕकडाऊनमुळे यावर्षी रेल्वे , आयुध निर्माणी, दीपनगर वीजनिर्मीती केंद्र हे बंद असल्याने अशा जादा वापर असलेल्या ठिकाणी पाण्याचा वापर न झाल्याने जलसाठा मुबलक प्रमाणात शिल्लक आहे. तसेच भुसावळ, मुक्ताईनगर , बोदवड, यावल , रावेर , या तालुक्यातील ३८ हजार हेक्टरवरील शेतीला याचा लाभ होणार असल्याची माहिती हतनूर धरणाचे उपअभियंता पी.एन. महाजन यांनी दिलेली आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत