भुसावळ तालुका समन्वयक पदी जान्हवी जितेंद्र नेहेते यांची निवड
(भुसावळ प्रतिनिधी):- येथील भारतीय राष्ट्रीय युवा परिषद भुसावळ तालुका समन्वयक पदी जान्हवी नेहेते हिची
निवड करण्यात आली आहे युवा परिषदेचे ,महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉ.त्रिवेनिकुमार कोरे आणि जळगाव जिल्हा अध्यक्ष तेजस पाटील यांनी ही नियुक्ती केली आहे. या नियुक्ती बद्दल त्यांचं सर्व स्तरावरून अभिनंदन होत आहे जान्हवी ही उच्च शिक्षित तरुणी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग या क्षेत्रात शिक्षण घेत आहे. जान्हवी यांनी लेवाजगत ला सांगितले की, माझी निवड ही विद्यार्थ्याच्या हितासाठी व त्यांना न्याय देण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील राहील असे प्रतिपादन नेहते नि केली आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत