धक्कादायक; सावद्यातील जगमाता चौक एक कोरोना बाधित रुग्णांचे निधन!
धक्कादायक; सावद्यातील जगमाता चौक
एक कोरोना बाधित
(सावदा प्रतिनिधी) :- गेल्या पाच दिवसा पूर्वी शहरातील जगमाता चौक येथील संशयित म्हणुन जळगाव येथे
उपचारासाठी दाखल केलेल्या रुग्णांचा तपासणी अहवाल
21 तारखेला प्राप्त झाला होता. आलेल्या कोरोना
तपासणी अहवालात रुग्ण पॉझिटिव्ह
आढळुन आल्याचे निष्पन्न झाले होते. आज सकाळी
आलेल्या वृत्ता नुसार सदरील जगमाता चौक येथील 56 वर्षीय पुरुष रुग्णांचा
मृत्यू झाला आहे असे प्रशासनाकडून कळवण्यात आले
आहे. सदरील घटना सावदा सह परिसरासाठी चिंताजनक आहे.
या घटनेने शहरात चिंता पसरली असुन
सदरील वृत्तास नगरपालिका मुख्याधिकारी सौरभ जोशी
यांनी दुजोरा दिला आहे.
सावदा शहरात कोरोना बाधित रुग्ण संख्या 39 झाली
असुन त्यात 7 मयत, 3 उपचार घेत आहे व बाकी सर्व
कोरोनाला मात देत घरी परतले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत