Contact Banner

राज्यातील व्यायामशाळा आणि केशकर्तनालये येत्या आठवड्यात सुरू होणार मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांची माहिती

राज्यातील व्यायामशाळा आणि केशकर्तनालये येत्या आठवड्यात सुरू होणार
मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांची माहिती
मुंबई, दि. २५ : मुंबईसह राज्यातील व्यायामशाळा व केशकर्तनालये (सलून) येत्या आठवड्याभरात सुरु होणार असून येत्या दोन दिवसांमध्ये याबाबतची नियमावली व मार्गदर्शक तत्त्वे आखून दिली जाणार असल्याची माहिती मुंबई शहरचे पालकमंत्री श्री.अस्लम शेख यांनी दिली आहे. 

राज्य मंत्रिमंडळाच्या आज पार पडलेल्या बैठकीनंतर श्री. शेख यांनी ही माहिती दिली. श्री. शेख यांनी सांगितले की, आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील व्यायायमशाळा व केशकर्तनालये सुरू करण्याबाबत चर्चा झाली. सलून व व्यायामशाळा सुरु करण्यासंदर्भातील नियमावली व मार्गदर्शक तत्त्वे राज्य शासन आखून देणार आहे. ही नियमावली सर्व व्यायामशाळा व केशकर्तनालये/सलून मालकांसाठी बंधनकारक असेल. जीमला जाणाऱ्यांनी तसेच केस कापण्यासाठी जाणाऱ्यांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे व मास्क वापरणे, सॅनिटायझेशन बंधनकारक आहे. सर्व नियमांचे कडक पालन करूनच प्राथमिकस्तरावर व्यायामशाळा व केशकर्तनालये उघडण्यास परवानगी दिली जाईल
मुंबई : शासनाने मिशन बिगिन अगेन टप्पा चारची घोषणा केली असून त्यानुसार काही अटी आणि शर्तींसह राज्यात सलूनची दुकाने सुरु करण्यास परवानगी दिली आहे.
मुंबईसह एमएमआर क्षेत्रातील महापालिका, पुणे, सोलापूर, औरंगाबाद, मालेगाव, नाशिक, धुळे, जळगाव, अकोला, अमरावती आणि नागपूर या महापालिकांमध्ये कंटेनमेंट झोन वगळता इतर क्षेत्रात केशकर्तनालये, सलुन्स, आणि ब्युटी पार्लर्स २८ जून पासून सुरु करता येतील. मात्र या दुकांनामध्ये प्रवेश मर्यादित स्वरुपाचा राहील व त्यासाठी पूर्व नियोजित वेळ ग्राहकाला घ्यावी लागेल. या दुकानांनी पुढील अटींचे बंधन पाळणे आवश्यक आहे.

· केशकर्तन, हेअर डाय, वॅक्सींग, थ्रेडींग याच मर्यादीत सेवा ग्राहकांना देता येतील. त्वचेशी ( दाढी) संबंधीत इतर कृती करण्यासाठी सध्या संमती नाही. ही बाब दुकानामध्ये ठळकपणे प्रदर्शित करावी लागेल.

· दुकानातील कर्मचाऱ्यांनी ग्लोव्हज, ॲप्रॉन आणि मास्कसारख्या सुरक्षीत साधनांचा वापर करणे बंधनकारक आहे.

· ग्राहकाला सेवा दिल्यानंतर प्रत्येक खुर्ची किंवा यासारखी प्रत्येक वस्तू सॅनिटाइज करावी लागेल. अशा दुकानातील वापराचा सर्वसाधारण भाग, पृष्ठभाग हा दर २ तासांनी सॅनिटाइज करणे गरजेचे आहे.

· फक्त एकदाच वापरता येतील असे टॉवेल, नॅपकिन्स यांचा ग्राहकांसाठी वापर करावा लागेल. ज्या वस्तूंची तत्काळ विल्हेवाट लावता येणे शक्य नाही अशी वस्तू प्रत्येक ग्राहकास सेवा दिल्यानंतर सॅनिटाइज करावी लागेल.

·उपरोक्त नमूद सावधगिरीबाबत प्रत्येक दुकानामध्ये ग्राहकांच्या माहितीसाठी नोटीस लावण्यात यावी.

राज्यातील उर्वरित भागांमध्ये केश कर्तनालये, सलून आणि ब्युटी पार्लर्स सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. यासाठी सुध्दा उपरोक्त नमूद सर्व अटींचे पालन करणे बंधनकारक आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.