जळगाव जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना खाजगी शाळांमध्ये मोफत प्रवेश मिळावा- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कडे विश्वजीत संजय पाटील यांची मागणी
जळगाव जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना खाजगी शाळांमध्ये मोफत प्रवेश मिळावा- विश्वजीत संजय पाटील
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना ई- मेल द्वारे निवेदन
मुक्ताईनगर प्रतिनिधी
संपुर्ण भारतात कोरोना महामारीने थैमान घातले आहे, त्यात महाराष्ट्रात कोरोनाचे संकट असता, जळगाव जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या ३हजारां च्या पलीकडे गेली आहे, कोरोनाच्या संकटात अनेकांचा रोजगार हिरावला गेलाय व शेतकर्यांच्या पिकाला भाव मिळत नाहीय अशी भयंकर परिस्थिती निर्माण झालीय , त्यातच जळगाव जिल्ह्यात केळी हे पिक प्रामुख्याने घेतले जाते,११शे. ते १२शे ररूपये क्विंटल असलेली केळी कोरोनाच्या संकटात २५० ते ३०० रुपये क्विंटल शेतकर्यांना विकावी लागली, त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी गेली 3 महिने हा आर्थिक संकटात सापडलाय, अनेक शेतकर्यांची मुल खाजगी शाळेत शिक्षण घेत आहे असे निवेदन महाराष्ट्र चे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना इमेल द्वारे मेहुन येथील शिवसैनिक विश्वजित पाटील यांनी केली आहे
आपण सदर परिस्थितीची दखल घेऊन
जळगाव जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना खाजगी शाळांमध्ये मोफत प्रवेश मिळतील असा प्रकारचा निर्णय घ्यावा अशी विनंतीही या निवेदनात करण्यात आली आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत