Contact Banner

कोरोना संसर्ग नियंत्रणात येताच पोलीस भरती प्रक्रिया सुरू होणार- अनिल देशमुख गृहमंत्री

कोरोना संसर्ग नियंत्रणात येताच पोलीस भरती प्रक्रिया सुरू होणार-अनिल देशमुख गृहमंत्री

कोल्हापूर प्रतिनिधी :- राज्यात रखडलेल्या आठ हजार पोलिसांच्या भरतीचे नियोजन लवकरच केले जाईल. कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात येताच भरतीची प्रक्रिया सुरू होईल, अशी ग्वाही गृहमंत्री अनिल देशमुख यांनी  रविवारी कोल्हापुरात पत्रकारांशी बोलत होते.
     कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रविवारी संध्याकाळी  गृहमंत्री अनिल  देशमुख यांनी कोल्हापुरातील प्रशासकीय कामांचा आढावा घेतला. या वेळी बोलतांना ते म्हणाले, कोरनाचा संसर्ग सुरू होण्यापूर्वी राज्यात आठ हजार पोलिस पदांच्या भरतीची घोषणा झाली होती. या करिता  उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. मात्र, कोरोनामुळे भरती प्रक्रिया राबवता आली नाही. कोरोना  संसर्ग नियंत्रणात येताच भरती प्रक्रिया  पुन्हा लगेच सुरू होईल. दरम्यान, राज्यात तीन हजाराहून अधिक पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांना करोनाचे संक्रमण झाले असून, यामध्ये ५८ कोरनाबाधित पोलिसांचा मृत्यू झाला आहे. राज्यात 3 हजार पोलीस कोरोना बाधित,मृत्युमुखी पडलेल्या पोलीसांच्या कुटुंबियांना ६५ लाख रूपयांची मदत, ८ हजार पोलिस भरती थाबली होत,ती पूर्ववत करण्याचा विचार सुरु आहे असे प्रतिपादन देशमुख यांनी केले.
संबंधित पोलिस कर्मचा-याच्या निवृत्ती कालावधीपर्यंत त्याच्या कुटुंबीयांना त्यांच्या शासकीय निवासस्थानात राहता येणार आहे. त्यांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारकडून सानुग्रह अनुदानासह पोलिस वेल्फेअर आणि अन्य मदत करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, खासदार संजय मंडलिक, आमदार ऋतुराज पाटील, आमदार राजेश पाटील, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, जिल्हाधिकारी दौलत देसाई, आदी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.