Contact Banner

नॅशनल युथ कॉन्सिल ऑफ इंडियाच्या भुसावळ तालुका पदाधिकाऱ्यांची निवड....

भुसावळ तालुका अध्यक्ष आकाश इंगळे

नॅशनल युथ कॉन्सिल ऑफ इंडियाच्या भुसावळ तालुका पदाधिकाऱ्यांची  निवड
:- नॅशनल युथ कॉन्सिल ऑफ इंडियाच्या भुसावळ तालुका अध्यक्ष पदी आकाश सुधाकर इंगळे, तालुका उपाध्यक्ष पदी गिरीश देविदास पाटील  व तालुका सचिव पदी नोविता सुरेश कोल्हे, तालुका समन्वयक पदी जान्हवी जितेंद्र नेहेते व रोहित हेमराज पाटील यांची निवड करण्यात आली. निवडीचे पत्र जिल्हा अध्यक्ष तेजस पाटील यांच्या शिफाशीनुसार राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. दत्तचना मूर्ती रामू व महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉ. त्रेविनिकुमार कोरे यांच्या हस्ते देण्यात आले. या निवडीबद्दल सर्व पदाधिकऱ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. संपुर्ण देशासाठी राष्ट्रीय एकात्मतेसाठी काम करून राष्ट्रीय युवा परिषदेच्या वतीने सामाजिक , सांस्कृतिक व शैक्षणिक उपक्रम राबविणार आहेत. लवकरच तालुका कार्यकारणी तयार करून घोषित करणार आहेत असे तालुका अध्यक्ष आकाश इंगळे यांनी सांगितले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.