शिवसेनेकडून विधानपरिषदसाठी इच्छुक उमेदवार, वाचा कोण आहेत शिवसेनेचे वाघ ??
शिवसेनेचे कोणते सहा इच्छुक उमेदवार विधानपरिषदेवर जाणार
(मुंबई लेवाजगत वृत्त सेवा ):- महाराष्ट्र राज्यातील राज्यपाल नियुक्त बारा विधान परिषदेवरील आमदारांचा मुदत लवकरच संपणार असुन त्या रिक्त होणाऱ्या जागांवरती नवीन विधान परिषद सदस्य निवड केली जाणार आहे. राज्यात महाविकासआघाडीतील तिघंही पक्षांना प्रत्येकी चार चार जागा वाटेला येतील अशी माहिती सुत्रांकडून मिळालेली आहे. राज्य शिवसेनेकडून विधांपरिषदेवर जायच्या निवडणुकीसाठी सहा जण इच्छुक असल्याची चर्चा आहे. शिवसेनेकडून विधानपरिषदेसाठी इच्छुक उमेदवार, या यादीत सर्वात प्रथम आघाडीवर असलेले नाव म्हणजे युवासेनेचे सरदेसाई वरूण . तसेच इतर इच्छुक उमेदवारांमध्ये शिवसेनेचे शिवाजीराव आढळराव पाटील माजी खासदार , चंद्रकांत खैरे शिवसेना नेते , अर्जुन खोतकर माजी मंत्री, शिवतारे विजय बापू आणि कोल्हापूर शिवसेनेचे माजी आमदार राजेश क्षीरसागर यांचीही नावे चर्चेत असल्याचे समजते आहे. एकूण बारा जागांपैकी शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांना प्रत्येकीचार चार जागा वाटुन येतील अशी प्राथमिक माहिती असली तरी तिन्ही पक्षांनीप्रत्येकी एक जागा मित्रपक्षाला द्यावी अशी चर्चा महाविकासआघाडीत चालू असल्याचे समजते आहे.
अखिल भारतीय राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अध्यक्ष शेट्टी राजू यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आमदारकीसाठी ऑफर दिली आणि बारामतीत शेट्टी यांनी थेट येऊन ती ऑफर स्वीकारली देखील. आता फक्त कुठल्या पक्षाला किती जागा मिळणार यावरून पुढील समीकरण ठरणार असल्याचे सांगितले जात आहे.
निवडणुकी विषयी शिवसेनेकडून पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे बैठक लवकरच बोलावणार असुन त्यात उमेदवारी कुणाला दिली जाणार हे निश्चित केले जाणार आहे.
शिवसेनेकडून इच्छुक असलेले उमेदवार सरदेसाई वरूण ,पाटील शिवाजीराव आढळराव ,खैरे चंद्रकांत ,खोतकर अर्जून ,शिवतारे विजय , क्षीरसागर राजेश हे इच्छुक आहेत.हे आहेत शिवसेनेकडून विधानपरिषदेसाठी इच्छुक उमेदवार.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत