Contact Banner

सुशांतसिंगचे गाणे व्हाँट्सअँप स्टेटसवर शिरसोलीच्या तरुणाची आत्महत्या काय आहे सत्य..?

सुशांतसिंगचे गाणे व्हाँट्सअँप  स्टेटसवर शिरसोलीच्या तरुणाची आत्महत्या काय आहे सत्य..?

जळगाव प्रतिनिधि:-
तालुक्यातील शिरसोली येथील एका तरुनाणे सुशांतसिंगच्या चित्रपटातील गाणी व्हाँट्सअँप स्टेटसवर ठेवून राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली .रविवारी दुपारी साडेतीन वाजता ही घटना घडली .घटनेमुळे शिरसोली गावात खळबळ उडाली आहे .तुषार ज्ञानेश्वर बारी (वय 21 रा .शिरसोली) असे मृत तरुणाचे नाव आहे. शिक्षणानंतर तो आई.-वडिलांना शेती कामात मदत करीत होता. दरम्यान रविवारी दुपारी त्याचे आई-वडील शेतात कामाला गेले होते.आजी  व लहान बहीण घरी असताना तुषार याने मागच्या खोलीत  ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली .आजचे लक्षात हा प्रकार आल्यानंतर त्यांनी अनेक आपण तुषारला खाली उतरवले .त्यानंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय त्याला आणले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून तुषारला मूत घोषित केले .या  घटनेनंतर कौटुंबिक नातेवाईकांचा प्रचंड धक्का बसला आहे कुटुंबांनी प्रचंड आक्रोश केला तुषार यांच्या पश्चात आई वडील लहान भाऊ लहान बहीण आणिl आजी असा परिवार आहे याप्रकरणी एमआयसीडी पोलीस ठाण्यात कामात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिस तपास करीत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.