Contact Banner

पाकिस्तान: कराची स्टॉक एक्सचेंजवर दहशतवादी हल्ला

पाकिस्तान: कराची स्टॉक एक्सचेंजवर दहशतवादी हल्ला

पाकिस्तान वृत:- पाकिस्तान: कराची स्टॉक एक्सचेंजवर दहशतवादी हल्ला, 9 लोकांचा मृत्यू, 4 दहशतवादी ठार, एका पोलिस अधिकाऱ्यासह 5 लोकांनीही गमावला जीव, एन्काउंटर सुरू कराची 7 मिनिटांपूर्वी पाकिस्तानातील कराची स्टॉक एक्स्चेंजवर सोमवारी सकाळी दहशतवाद्यांनी हल्ला केला. जियो न्यूज चॅनलनुसार, चार दहशतवादी मारले गेले असून इतर
लोकांना मृत्यू झाला आहे.पोलीस आणि रेंजर्सची टीम घटनास्थळावर असून लोकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू आहेत.एन्काउंटर अजूनही सुरु असल्याची माहिती समोर येत आहे.

एक्स्चेंज उघडताच हल्ला

मीडिया रिपोर्टनुसार, कराची स्टॉक एक्स्चेंज सकाळी
१०.३०वाजता उघडते.आजही सकाळी एक्सचेंज उघडल्यानंतर सामान्य लोक आणि कर्मचाऱ्यांसोबत सशस्त्र दहशतवादी आत घुसले.दहशतवाद्यांना पाहताच
लोक पळू लागले.या दरम्यान पोलिसांना सूचना देण्यात आली आणि काही वेळातच बिल्डिंगला घेरण्यात आले.

जियो न्यूजनुसार स्टॉक एक्स्चेंजच्या ५ कर्मचाऱ्यांना मृत्यू झाला आहे.दहशतवादी सुरुवातीला पार्किंगमध्ये जाण्याचा प्रयत्न करत असल्याचे सांगण्यात येत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.