सावदा येथे गावठी कट्टा बाळगणाऱ्या मोठा आखाडा परिसरातील तरुणास अटक
गावठी कट्टा बाळगणाऱ्या सावद्यातील मोठा आखाडा परिसरातील तरुणास अटक
सावदा, लेवाजगत वृत्त सेवा :-
येथे गावठी ककट्टा बाळगणार्या एका तरूणाला पोलीसांनी बस स्थानकाच्या समोर अटक केली असून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहरात या गुन्हा दाखल झाल्याने खडबड उडाली आहे .
सावदा बस स्थानकाच्या समोर असणार्या भारंबे वर्कशॉपच्या समोर रात्री साडेदहाच्या आसपास सैयद इकबाल उर्फ भुरा सैयद सलाऊद्दीन ( वय ३५; रा. मोठा आखाडा परिसर सावदा) याला सावदा पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडे देशी बनावटीचा कट्टा आणि त्याच्या सोबत मॅगेझीन आढळून आले. पोलिसांनी संशयिताला अटक करून त्याच्याकडून गावठी कट्टा व मॅगेझीन जप्त केले आहे. त्याच्या विरूध्द आर्म अॅक्ट कलम ३/२५; मुंबई पोलीस अधिनियम ३७ (१); (३); १३५; भादंवि कलम १८८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सावदा पोलीस स्थानकाचे सपोनि राहूल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली रवींद्र मोरे हे करीत आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत