चिनावलच्या कोरोना मुक्त रुग्णाचा जंगी सत्कार : अधिकाऱ्यांनकडून परिसराची पाहणी !
प्रतिनिधी सावदा
चिनावल येथील पहिला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण हे कोरोना रोगांवर मात करून घरी परतले त्याचा जंगी सत्कार करण्यात आला तसेच गावात कोरोना चे रुग्ण वाढतच असल्याने येथील वैद्यकीय अधिकारी व प्रशासकीय अधिकारी यांनी भेट देऊन गावात सक्तीने उपाय योजना राबविण्याच्या सूचना दिल्या आहेत.
कोरोना योद्धा ,प्रांत अधिकारी अजीत थोरबोले ,बी.डी.ओ.सोनिया नाकाडे वैद्यकीय अधिकारी विजया झोपे , डॉ ठाकूर यांनी कोरोना मुक्त झालेल्या व्यक्तीचा सत्कार केला
तसेच चिनावल येथे कोरोना पाॅझीटीव्ह २ रग्णाचा मृत्यू
झाला आहे तर आणखी १ रुग्ण बरा होवून घरी परतला आहे तर ५ जणांवर कोविड सेंटर मध्ये उपचार सुरू आहे आतापर्यंत एकूण ७ जण बाधीत झाले आहे. दिवसेंदिवस गावात रूग्ण संख्या वाढत असल्याने गावकऱ्यांनी खबरदारी घेण्याचे आवाहन ग्रामपंचायत , आरोग्य विभाग व प्रशासनाने केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत