Contact Banner

कोचुर येथे आ.चंद्रकांत पाटील यांचे उपस्थितीत जुळल्या आदर्श रेशिम गाठी

कोचुर येथे आ.चंद्रकांत पाटील यांचे उपस्थितीत जुळल्या आदर्श रेशिम गाठी*
सावदा/प्रतीनिधी दि.11/5
कोरोणा विषाणू च्या पार्श्वभूमीवर संपुर्ण चालीरीती बदलल्या असुन रावेर तालुक्यात भरमसाठ विवाहसाठी पैसा खर्च करणाऱ्या मंडळी कडुन कोरोना आजाराच्या कालखंडात  आदर्श पध्दतीने विवाह सोहळा साजरा करुन तालुक्यासह जिल्ह्यात एक नवा पायंडा घालुन दिला आहे
कोचुर ता. रावेर येथील मा.सरपंच दाम्पत्य मिराबाई पाटील व रमेश पाटील यांचे  सुपुत्र व सामाजिक कार्यकर्ते कमलाकर पाटील यांचे धाकटे बंधु तर तालुक्यातील धामोडी येथील पंडीत शालीग्राम पाटील यांची सुकन्या यांचा विवाह दि.११ गुरुवार रोजी कोचुर येथे वर पित्याच्या घरी अत्यंत साधेपनाने संपन्न झाला यावेळी आ.चंद्रकांत पाटील व सावदा शहराचे मा.नगराध्यक्ष विद्यमान नगरसेवक राजेश वानखेडे,जळगाव जिल्हा विद्याप्रसारक मंडळाचे विरेंद्र भोईटे व्हाईसचेअरमण  चाळीस ग्रामस्थ   उपस्थित होते तर नातलगांनी आँनलाईन शुभेच्छा दिल्या विशेष म्हणजे हा विवाह सोहळा अगदी साध्या व सोप्या पद्धतीने पार पाडावा हे वधु - वर या दोन्ही कडील मंडळींचा पूर्वनियोजित संकल्प होताच त्याला लॉकडाऊन निमित्तमात्र झाले . कमी खर्चात व कमी श्रमात धार्मिक पावित्र्य जपून विवाह सोपस्कार पूर्ण केल्याने या विवाहाची संपूर्ण तालुक्यात चर्चा आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.