सावद्यात काय सुरू राहणार
सावदा शहरातील सर्व नागरिकांना सूचित करण्यात येते की यापुढे कटिंगची दुकाने, सलून, ब्युटी पार्लर, स्पा सेंटर, शॉपिंग मॉल,हॉटेल्स, रेस्टोरेंट,सर्व धार्मिक ठिकाणे, शाळा, कॉलेज, कोचिंग क्लासेस, सिनेमागृह सोडून इतर सर्व दुकाने सकाळी ९ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत सुरू राहतील.
एका वेळी फक्त १ व्यक्ती काउंटर वर उभा राहील तसेच सोशल Distancing चे पालन होईल हे पाहण्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित दुकानदार यांची राहील,अन्यथा संबंधित दुकान सील करण्याची कार्यवाही नगरपालिका प्रशासनातर्फे करण्यात येईल,याची सर्वांनी गंभीर नोंद घ्यावी. तसेच दुकानदार यांनी स्वतः मास्क वापरणे बंधनकारक आहे.
नागरिकांनी सार्वजनिक तसेच कामाच्या ठिकाणी mask वापरने बंधनकारक आहे. मास्क न वापरल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल.
नगरपरिषद सावदा
कोणत्याही टिप्पण्या नाहीत