Header Ads

Header ADS

निंभोरा परिसरात चक्रीवादळामुळे केळी उत्पादकांचे लाखो रुपयांचे नुकसान.

निंभोरा परिसरात चक्रीवादळामुळे केळी उत्पादकांचे लाखो रुपयांचे नुकसान.
केळीसह मोठमोठी झाडे,वीज तारांसह खांब वाकले.
 निभोरा लेवाजगत वृत्त सेवा :-निंभोरा-येथे व  वडगाव,विवरा,वाघोदा यांसह , चिनावल व कुंभारखेड्याच्या काही भागात  आलेल्या जोरदार चक्रीवादळासह पावसामुळे १० ते १२ किलोमीटरच्या पट्ट्यात दुपारी ०२वाजेच्या सुमारास अचानक आलेल्या जोरदार वाऱ्यासोबत पावसाने केळी उत्पादकांचे कंबरडे मोडले.जोरदार चक्राकार वाऱ्यांमुळे वडगाव रस्ता,विवरा रस्ता,तसेच बऱ्हाणपूर- अंकलेश्वर रस्त्यावर मोठमोठी झाडे ही जमीनदोस्त झाली. या पट्ट्यातील कापणी योग्य असलेल्या टीश्युकल्चर रोपांसह केळी बागांचे मोठे नुकसान झाले.या पट्ट्यातील शेकडो एकर केळी बागा जमीनदोस्त झाल्या.गेल्या आठवड्यात ३००ते ३५०रुपये दरावरून केळीचे बाजारभाव चांगल्याच  तेजीत येण्याचे संकेत दिसत असतांना तसेच ७०० ते ८००रुपयांपर्यंत केळीची खरेदी सुरू झाली असतांना झालेल्या या नुकसानाने  या पट्ट्यातील केळी उत्पादक पुरते हादरले. 
वारा इतक्या वेगात होता की शेतातील मोठमोठी झाडे उन्मळून पडत विजतारा व इलेक्ट्रिक खांब वाऱ्याच्या वेगात आडवे झाले.दरम्यान १० ते १२ किलोमीटरच्या या पट्ट्यात हे वादळ झाले.या वादळात शेकडो शेतकऱ्यांची हजारो क्विंटल केळी कोटीच्या घरात नुकसान करून गेली.दरम्यान या वादळाची नोंद घेत पंचनाम्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.