Contact Banner

कपाशीचे अनधिकृत बियाणे जप्त

कपाशीचे अनधिकृत बियाणे जप्त*
  जळगाव, दि. 12 (जिमाका वृत्तसेवा) – शासनाकडून मान्यता नसलेले व विक्रीस बंदी असलेले अनधिकृत एचटीबीटी कापूस बियाणे चोपडा येथे कृषी विभागाच्या गुणवत्ता नियंत्रण अधिका-यांनी धडक कार्यवाही व सापळा रचून  13 हजार 500 रुपये किमतीचे 11 कापूस बियाण्याची पा‍किटे जप्त केली. एरंडोल येथे सुध्दा  बालाजी ॲग्रो येथो सापळा रचून एकूण  28 हजार 800 रुपये किमतीचे 32 कापूस बियाणे पाकिटे जप्त करुन संबंधितांवर चोपडा व एरंडोल पोलिस ठाणे येथे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. शेतकरी बांधवांनी एचटीबीटी बियाणे खरेदी करु नये व बियाणे खरेदी करताना सतर्कता बाळगावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.
00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.