सावद्याच्या नागरिकांना मोठा दिलासा, ३५ संशयित व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह
सावद्याच्या नागरिकांना मोठा दिलासा, ३५ संशयित व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह
-:सावदा लेवाजगत वृत्त सेवा:-( दि ६)शहरात कोरोना बाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे आपण बघत आहात पण आता आज आलेल्या वृत्तानुसार सावदा येथील ३५ अहवाल निगेटिव्ह आल्याने शहरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे . निगेटिव्ह आलेल्या व्यक्तीना डिस्चार्ज देण्यात येणार आहे.
तसेच सावदा शहारत सुध्दा कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना आता ३५ संशयित व पोझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींचेअहवाल निगेटिव्ह आले आहे ,असून यात गांधी चौकातील माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक यांचे कुटुंबातील ,गवत बाजारातील पॉझिटिव्ह रुग्णाच्या कुटुंबातील ,संपर्कातील ,पोलीस अधिकारी ,पालिका अधिकारी,कर्मचारी यांचे स्वाब बरेच दिवसापासून घेण्यात आले होते त्या व्यक्तीचे तपासणी अहवाला कडे सावदा वासीयांचे व आजु बाजुच्या परिसराचे लक्ष लागुन होते त्या व्यक्तीचे अहवाल आज प्राप्त झाले असुन सावदा व परिसरासाठी दिलासादायक वृत्त आहे.
त्या सर्व ३५ व्यक्तीचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर निगेटिव्ह आलेल्या व्यक्तीना संध्याकाळ पर्यंत डिस्चार्ज देण्यात येणार असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. शामवेल बारेला यांनी दिली आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत