Header Ads

Header ADS

सावद्यात २ मृताच्या कुटुंबातील ११व्यक्ती पॉझिटिव्ह सावद्यात ऐकून झाले ३२पॉझिटिव्ह

सावद्यात  २ मृताच्या कुटुंबातील ११व्यक्ती पॉझिटिव्ह 
सावद्यात ऐकून झाले ३२पॉझिटिव्ह
सावदा,  प्रतिनिधी । आज  दि ४रोजी रात्री उशीरा आलेल्या रिपोर्टमध्ये शहरातील तब्बल ११ जण कोरोना पॉझिटीव्ह आले असून हे रूग्ण आधी मयत झालेल्या कोरोना बाधीतांच्या कुटुंबातील असल्याची माहिती  आरोग्य अधिकारी  डॉ  गणेशमराठे यांनी सांगितले 

याबाबत माहिती अशी की, शहरातील संभाजी चौक
परिसरातील एका कोरोना पॉझिटीव्ह रूग्णाचा १० दिवसांपूर्वी मृत्यू झाला होता.त्याच्या कुटुंबियांना क्वॉरंटाईन करून त्यांचे स्वॅब सँपल घेण्यात आले होते.
आज रात्री उशीरा यातील नऊ जण कोरोना पॉझिटिव्ह 
असल्याचे निष्पन्न झाले आहे.तर गवतबाजार परिसरातील मृत कोरोना बाधीत महिलेच्या कुटुंबातील दोन जणांनाही कोरोनाची बाधा झालेली आहे.यामुळे आज रात्री उशीरा शहरात अकरा कोरोना बाधीत आढळून आले  यात ४महिला व ७ पुरुष असून या वृत्ताला मुख्याधिकारी सौरभ जोशी व वैद्यकीय अधिकारी डॉ.गणेश मराठे यांनी दुजोरा दिला आहे.सावद्यात ऐकून बाधितांच्या संख्या ३२ झाली आहे

1 टिप्पणी:

  1. रिपोर्ट येण्यासाठी खूपच उशीर होतोय यासाठी सरकारी यंत्रणेला लवकरात लवकर रिपोर्ट येईल अशी व्यवस्था करावी म्हणजे कमी लोकं पोसिटीव्ह होतील आणी आपले शहरातील हि संख्या आटोक्यात येण्यासाठी मदत होईल🙏

    उत्तर द्याहटवा

Blogger द्वारे प्रायोजित.