सावदा परिसरात वादळाची शक्यता ,सतर्क रहा
सावद्यात आज रात्री वादळाचा तडाखा बसण्याची शक्यता
सावदा शहरात दिनांक 3 रोजी रात्री अकरा पीएम वाजता वादळाचा तडाखा बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे त्याचे चित्र आपण बघू शकता लेवा जगत ब्लॉग वरती चार तारखेला येणारे हे वादळ तीन लाख धडकण्याची शक्यता असून नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन करण्यात येत आहे.
मा.जिल्हाधिकारी साहेब जळगांव यांचे आदेशानुसार सर्व नागरिकांना कळविण्यात येते की अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने उत्तर महाराष्ट्रात चक्रिवादळाच्या धोक्याचा इशारा देण्यात आला आहे.त्यामुळे नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. कच्च्या घरात राहणारे नागरिक यांनी सुरक्षिततेची काळजी घ्यावी.
वादळामुळे झाडे पडणे,पत्रे उडणे,जोरदार पाऊस यामूळे जीवीत हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. चक्रिवादळाच्या अनुषंगाने सुरक्षिततेच्या दृष्टीने नागरिकांनी आवश्यक काळजी घ्यावी व प्रशासनास सहकार्य करावे.आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी अग्निशमन विभाग सावदा नगरपरिषद यांच्या 02584-222345 या क्रमांकावर संपर्क साधावा.
*सावदा नगरपरिषद सावदा*



कोणत्याही टिप्पण्या नाहीत