सर्वसामान्यांना मिळणार सरपंच बनण्याची सुवर्णसंधी
मुंबई प्रतिनिधि:- भावी सरपंच होणाऱ्या सुवर्णसंधी. राज्यपालांच्या आदेशाने सर्वसामान्य व्यक्तीच्या हातात जाऊ शकतो ग्रामपंचायतीचा कारभार. घरातील प्रशासक नेमला जावा यासाठी विद्यमान सरपंच लागलेत
कामाला.
राज्यात मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीवर यापुढे प्रशासक म्हणून शासकीय अधिकाऱ्यांची व कर्मचाऱ्यांची नेमणूक केली जाणार नसून त्याऐवजी गावातील योग्य व्यक्तीची निवड केली जाईल असा आदेश राज्यपाल यांनी दिले आहेत.
या निर्णयाने प्रशासक पदी नियुक्त झालेल्या सर्वसामान्य व्यक्तीला ग्रामपंचायतचा कारभार करण्याची संधी मिळणार असून निवडून न येता गावाचा कारभार करता येणार आहे.
प्रशासक म्हणून काही बंधन असतील मात्र काम करण्याची संधी मात्र मिळणार आहे.
यासंदर्भात सुधारित आदेश राज्याचे मुख्य अप्पर सचिवानी २५ जून रोजी निर्गमित केले आहे.राज्यातील १२ हजार ६६८ ग्रामपंचायतीची मुदत डिसेंबर मध्ये संपत असून कोरोणामुळे उद्भवलेल्या परिस्थिती ने निवडणुका घेणे शक्य नसल्याने त्या ठिकाणी शासकीय प्रशासक नेमावा असे ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी घोषित केले होते.
मात्र विधानसभा व विधानपरिषद दोन्ही सभागृह बंद असल्याने याबाबत आदेश निघू शकले नाही.दरम्यान राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी राज्यातील नैसर्गिक आपत्ती वित्तीय आणीबाणी सांग विचार करून महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९(३) यात सुधारणा करून ज्या ग्रामपंचायतींची मुदत संपली असेल अशा ठिकाणी शासकीय प्रशासकीय व्यक्तीला न नेमता गावातील एका योग्य व्यक्तीची निवड करण्यासंदर्भात निर्णय घेतला आहे.
गावातील योग्य व्यक्तीची निवड करण्यासंदर्भातला आदेश निघताच अनेकांनी फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली असून बहुतांशी ठिकाणी सरपंच मंडळी आपल्या कुटुंबातीलच प्रशासक कसा नेमला जाईल याची सुद्धा तयारी करत असल्याचे चित्र असून गावातील राजकीय व्यक्ती सुद्धा यात मागे नसून सर्वांनी आपापल्या परीने प्रयत्न करीत आहेत प्रत्येक जण प्रशासक म्हणून आपली कशी वर्णीलागेल
यासाठी फिल्डिंग लावत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत