Contact Banner

बोर्डाच्या १० वी, १२ वीच्या निकालाची तारीख अखेर जाहीर (सीबीएसई)

 
बोर्डाच्या १० वी, १२ वीच्या निकालाची तारीख अखेर जाहीर (सीबीएसई)
नवी दिल्ली (वृत्तसेवा) सीबीएसई बोर्डाच्या दहावी आणि बारावीचा निकालाची संभ्रमता आज अखेर संपली आहे.१८ जुलैला १२ वीच्या वर्गाचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे.तर १० वी इयत्तेचा निकाल १५ ते १७ जुलैदरम्यान जाहीर करण्यात येणार आहे.
सीबीएसई दोन्ही वर्गाची माहिती वेबसाइट वर अपलोड केली आहे. या अगोदरच १० वी १२ वीच्या राहिलेल्या विषयांची परिक्षा रद्द करण्याची घोषणा बोर्डाने नुकतीच केली आहे. त्यानंतर लगेच रिझल्ट लावण्यासाठी सीबीएसई बोर्डाने तयारी केली होती. त्यानुसार आता निकालाची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाली असून १८ जुलै रोजी १२ तर १५ ते १७ जुलै दरम्यान १० वीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. दरम्यान, लॉकडाऊनमुळे शाळा, कॉलेज बंद आहेत. यामुळे विद्यार्थ्यांवर अभ्यासक्रमाचा भार येऊ नये यासाठी सीबीएसई इयत्ता ९ ते १२ चा अभ्यासक्रम २०२०-२१ शैक्षणिक वर्षासाठी ३० टक्के कमी करणार असून महत्त्वाच्या विषयांच्या कन्स्पेट अभ्यासक्रमात राहणार आहेत. कोरोना व्हायरसच्या जागतिक संकटाचा इतर क्षेत्रांसोबत शिक्षण क्षेत्रावरही मोठा परिणाम झाला आहे. जूनचा पहिला आठवडा संपला तरीही १० वी आणि १२ वीच्या निकालाची तारीख अद्याप जाहीर करण्यात आली नव्हती. त्यामुळे नेमका निकाल कधी लागणार? असा प्रश्न विद्यार्थी आणि पालकांच्या मनात निर्माण झाला होता. परंतू आता तारखा जाहीर झाल्यामुळे गोंधळ मिटला आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.