Contact Banner

अखेर रशियातून 52 विद्यार्थ्यांची सुखरूप सुटका खा .सुप्रिया ताई च्या पाठपुराव्याला यश ....

अखेर रशियातून 52 विद्यार्थ्यांची सुखरूप सुटका खा .सुप्रिया ताई च्या पाठपुराव्याला  यश ....

मुंबई वृत्त सेवा: गेल्या काही महिन्यापासून जगावर कोरोना च संकट ओढविले आहे अश्यातच रशियातल्या मास्को शहराजवळील पेंझा  शहरातल्या पेंझा विद्यापीठात महाराष्ट्रातील बावन्न विद्यार्थी हे अडकले होते वंदे भारत मिशन अंतर्गत त्यांना मायदेशी परत आणण्यासाठी मोठ्या प्रमाणावर अडचणींचा सामना करावा लागत होता अशा स्थितीत संबंधित विद्यार्थ्यांनी सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे अमरजीत गिरासे व राष्ट्रवादी युवती उत्तर महाराष्ट्र समन्व्यक दिव्या ताई पाटील   यांच्याशी संपर्क साधला अमरजीत गिरासे व दिव्याताई पाटील  यांनी संबंधित मुलांना सोडविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा पणाला लावली दिव्या ताई पाटील यांनी सुप्रियाताई सुळे यांच्याशी संपर्क करत विदेश मंत्रालयाला पाठपुरावा करण्यास सांगितले तर त्याच पद्धतीने अमरजित गिरासे यांनी उच्च व तंत्र शिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे तसेच माजी संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांना संबंधित विद्यार्थ्यांचे पूर्ण माहिती दिली अशातच आदरणीय मंत्री महोदय एकनाथ शिंदे व खासदार श्रीकांत शिंदे यांनी शर्थीचे प्रयत्न केले आहे तरी सर्व विद्यार्थ्यांच्या तांत्रिक अडचणी दूर झाल्या असून , माननीय विदेश मंत्रालय व भारतीय दूतावास तर्फे सर्व महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना टप्प्याटप्प्यानेआणले जाईल अशी ग्वाही .महाराष्ट्र शासना आणि अमरजित गिरासे यांना दिली आहे . नुकतेच त्यापैकी काही विद्यार्थी देखील परतले आहेत अशातच मास्को ते मुंबई विमानाच्या फेऱ्या या अजून वाढल्या असून लवकरच सर्व विध्यार्थी मित्राना परत आणले जाईल....अमरजितसिग गिरासे यांनी दिव्या ताई पाटील यांनी राबविलेल मिशन रशिया च कौतूक सर्वच स्तरातून होत असून सर्व असलेल्या विध्यार्थीनी सुप्रिया ताई सुळे,  अमरजित गिरासे व दिव्या पाटील यांचे आभार व्यक्त केले आहेत.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.