सावद्यात धक्का, 53 वर्षीय पुरुष पॉझिटिव्ह फिफ्टी पूर्ण
सावद्यात 53 वर्षीय पुरुष पॉझिटिव्ह, फिफ्टी पूर्ण
सावदा (प्रतिनिधी):- दि.5 रोजी आलेल्या कोरोना तपासणी अहवालात सावदा शहरातील धान्य मार्केट मागील निमजाय माता नगर मधील 53 वर्षीय पुरुष पॉझिटिव्ह आल्याने या भागात चिंतेचे वातावरण झाले आहे, सदरील रूग्ण चा संपर्कातील कुटुंबातील व्यक्तीना क्वारान्टीन करण्यात येत असून परिसर प्रशासन मार्फत सील करण्यात येत आहे आता शहरात एकुण 50 रूग्ण कोरोना पॉझिटिव्ह आहे, अशी माहिती मुख्याधिकारी सौरभ जोशी यांनी दिली आहे.
.
सावदा शहरात कोरोना बाधित रुग्ण संख्या फिफ्टी झाली
असुन त्यात 8 मयत, 12 जण उपचार घेत आहेत व बाकी सर्व ३३व्यक्ती कोरोनाला मात देत घरी परतले आहे.
सावद्यात २७ पथका कडून सर्वेक्षण सुरू आहे
जिल्हाधिकारी यांचे आदेशाने मुख्याधिकारी सौरभ जोशी यांचे अंतर्गत करोना च्या पार्श्वभूमी वर रुग्ण शोध मोहीमेत विद्यालय, कनिष्ठ महाविद्यालय यातील शिक्षिका, शिक्षक, शिक्षिकेतरपालिका कर्मचारी गत महिन्या पासून शहरातील प्रत्येक घरो घरी ५ वेळा भेटी देऊन त्यांनी ऑक्सिमीटर द्वारे चेकिंग करीत आहे.
आज मितीस सर्वेक्षण अहवाल खालील प्रमाणे..
कंटेन्मेंट झोन १३ असून, कोरोना सर्वेक्षण एकूण
कुटुंब---४८३
पुरुष---१०१२
स्त्रिया---९२६
लोकसंख्या--१९३८
६० वर्षावरील लोकसंख्या--३८३
१० वर्षाखालील लोकसंख्या--१९२
आजारी असलेले---१०१
एकूण रूग्ण--४९ पॉझिटिव्ह
मयत-पॉझिटिव्ह--८
पॉझिटिव्ह बरे झालेले रूग्ण-- ३०
उपचार सुरु असलेले--१२
कोणत्याही टिप्पण्या नाहीत