जगभरात 4 कोटी 58 लाख भारतीय महिला बेपत्ता
वाँशिंग्टन: जगभरात गेल्या 50 वर्षात बेपत्ता झालेल्या तब्बल 14 कोटी 26 लाख महिलांमध्ये सुमारे 4 कोठी 58 लाख महिला भारतीय आहेत अशी धक्कादायक माहिती मंगळवारी प्रकाशझोतात आली आहे जागतिक स्तरावर महिला बेपत्ता होण्याचा संदर्भात चीन व भारत अव्वलस्थानि आहे याचीवेळी मुलीपेक्षा मुलगा बरा या अट्टाहास्सापोटी जगातील महिला पुरुष विषमता वाढीस लागत आहेत यामुळे लोकसंख्येचे असंतुलन वाढुन त्याचा विवाह संस्थेवर विपरीत परिणाम होत असल्याचे तथ्य सोमवार आले आहे.संयुक्त राष्ट्रप्रनित लोकसंख्या कोष ने (युएनएफ पिएफ) जागतिक लोकसंख्या स्थिती 2020 अहवाल सार्वजनिक केला त्यानुसार 50 वर्षात झालेल्या महिलांची संख्या दुप्पट झाली आहे 1970 मध्ये हाच आकडा 6 कोटी 10 लाख एवढा होता तर 2020 मध्ये बेपत्ता महिलांची त्यांची संख्या तब्बल 14 कोटी 26 लाख घरात पोहोचली आहे यात प्रामुख्याने भारताच्या 4 कोटी 58 लाख तर चीनच्या 7 कोठी 23 लाख महिला आहेत प्रसूतिपूर्व किंवा त्यानंतर लिंगनिदान केल्यानंतर बेपत्ता झालेल्या मुलींचीही यात समावेश करण्यात आला आहे 2013 ते 2017 या काळात भारतातील 4 लाख 60 हजार मुली जन्मताच बेपत्ता झाल्या आहेत असे अहवालात नमूद आहे एका विश्लेषणानुसार एकूण बेपत्ता मुलीपैकी जवळपास दोन तुतीयांश प्रकरणे आणि जन्म घेताना मरण पावणाऱ्यापैकी एक तुतीयांश मुलींना लींग निदानाचा फटका बसला आहे
दरम्यान दरवर्षीच्या जन्मदर प्रकरणात भारत आणि चीन अव्वलस्थानी आहे यात 12 ते 15 लाखपैकी जवळपास 90 ते 95 टक्के मुली भारत व चीनमधील आहेत म्हणून या देशांमधील सरकारने गर्भलिंग निदान करण्यास चाप लावत यासंदर्भात ठोस
पावले उचलावीत असे आव्हान युएनएफपिएफने केले भारतआणि व्हिएतनाम सरकारने महिलांविषयीची चुकीची लोकधोरणा बदलण्यासाठी मोहीम हाती घेतली आहेत मुलींपेक्षा मुलगा बरा या अट्टहासापोटी महिला पुरुष विषमता वाढीस लागत आहे यामुळेच लोकसंख्येचे असंतुलन वाढत असून त्याचा विवाह प्रणालीवरीही विपरीत परिणाम होत असल्याचे अधोरेखित केले आहे.
...तर लग्नासाठी मुलीच मिळणार नाहीत
आगामी काळात भारतात स्त्री-पुरुष लिंग गुणोत्तर बिघडण्याचा अंदाज आहे भारतात सभाव्य वधूंच्या तुलनेत वारांची संख्या प्रचंड वाढणार आहेत त्यामुळे 2055 मध्ये विवाहासाठी मुली मिळणार नाहीत एव्हाना वयाच्या पन्नशीपर्यंत मुले अविवाहित राहतील अशी बिकट परिस्थिती निर्माण आहे होईल तसेच 2050 पर्यंत विवाह न होण्याऱ्याचे प्रमाण 10 टक्क्यापर्यंत वाढेल असा अंदाज 'युएनएफपिएफ' ने व्यक्त केला.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत