चीन विरोधी संघर्ष अमेरिकेचे भारताला पाठबळ,भारत हा त्यांच्या मुजोरीला घाबरत नाही, अमेरिकेलाही मान्य
वॉशिंग्टन:- पूर्व लडाखमध्ये चिनी सैनिकांसोबत झालेल्या हिंसक चकमक प्रकरणी अमेरिकेने मंगळवारी भारताविषयी एकजुडता दाखवली आहे चीनच्या धाकदडपशाहीला अजिबात घाबरत नसल्याचे भारताने स्पष्ट केल्याची बाब अमेरिकेने अधोरेखित केली आहे अमेरिकेच्या पाठबळामुळे चीन विरोधी कुटणीतीक लढ्यात भारताला आणखी बळ प्राप्त झाले आहे. अमेरिकेतील सत्तारूढ रिपब्लिकन पक्षाचे खासदार मॅक्रो रुबियो यांनी भारताचे राजदूत येथे तरणजित सिंह संधू यांच्याशी वॉशिंग्टन येथे चर्चा केली आहे यावेळी चीनसोबत झालेल्या घनधोर संघर्षाविषय त्यांनी भारताच्या बाजूने एकजुटता दाखवले आहे सीमा प्रश्नि भारत चीनला अजिबात घाबरत नाही असे तरुणजित यांनी स्पष्ट केल्याने खासदार मार्को रुबिया यांनी ट्विटरवरुन सांगितले याच वेळी सिनेट मधील सत्तारूढ पक्षाचे नेते माँक मक्कोनेल यांनी एकाच आठवड्यात दुसऱ्यांदा चीनवर आगपाखड केली आहे खोडसाळ पवित्रा अगिकारत चिनने भारताविषयी आक्रमता दाखवल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे तत्पुर्वी खासदार। टाँम काँटन यांनी भारताविरोधातील चीनचा हिंसक पवित्र्याचा तीव्र शब्दात निषेध केला आहे एवढेच नव्हे तर जपानच्या समुद्र हद्दीत स्वतःच्या हिंसक संघर्ष करण्याची खोड चीनने काढले असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे दरम्यान गेल्या 15 जून रोजी भारताच्या पूर्व लढाख क्षेत्रात चीन सोबत संघर्ष घडला होता यात भारताच्या 20 जवानांना वीरमरण आले तेव्हापासून उभय देशांमध्ये तणावाचे वातावरण आहे भारत-चीन मध्ये अद्यापही समीर घटलेला नाही यात त्यातच अमेरिकेसह अनेक देशांनी भारताला बळ दिले आहेत.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत