Contact Banner

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या जळगावात

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
उद्या जळगावात


जळगाव प्रतिनिधी । माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान
विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे उद्या
दिनांक ८ जुलै रोजी जळगावच्या दौऱ्यावर येत आहेत.
माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान विधानसभेतील विरोधी
पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे जळगाव येथे येत असून
याबाबतचा अधिकृत दौरा जिल्हा माहिती कार्यालयाने
जाहीर केला आहे. यानुसार ते मालेगाव येथून जळगाव येथे
येणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे. फडणवीस हे
सकाळी ९.३० वाजताच जळगाव येथे येणार आहेत. ते
जीएमसी कोविड सेंटरला भेट देणार असून नंतर ते
जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत. यानंतर ते
जळगाव येथे मुक्कामी न थांबता औरंगाबाद येथे जाणार
असल्याचे जिल्हा माहिती कार्यालयाने नवीन दौऱ्यात नमूद
केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.