Contact Banner

विजेच्या मीटरमध्ये चिनी सुट्या भागांचा वापर होणार नाही,या गोष्टी भारतात बंद

विजेच्या मीटरमध्ये चिनी सुट्या भागांचा वापर होणार नाही

नवी दिल्ली वृत:-
भविष्यात विजेच्या मिटेमध्ये  चिनी सुट्या भागांचा वापर होणार नाही. विजेच्या मिटेमध्ये विदेशी सुटे भाग किती टक्के व स्थानिक सुटे भाग किती याचा अहवाल केंद्रीय उर्जा मंत्रालयाने विजेचे मीटर बनवण्याऱ्या सर्व कंपन्यांकडून मागवला आहे विजेच्या मीटरमध्ये जास्तीत जास्त भारतीय सुट्या भागांचा वापर करावा असेही मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. चिनरून विजेची उपकरणे आयात केली जाणार नाहीत असे केंद्रिय विजमंत्री आर.के.सिंग यांनीही स्पष्ट केले आहे 
विजेच्या मीटरचे उत्पादन करणाऱ्या 5 ते 6 कंपन्याकडून अलीकडेच मीटरमध्ये वापरत येणाऱ्या सुट्या भागांचा संदर्भात अहवाल मागवला आहे यामध्ये चीनसह किती देशांमधून विदेशी सुटे भाग व किती स्थानिक सुटे भाग वापरले जातात अशी विचारणा यामध्ये केली अशे सर्व कंपन्यांना या आठवड्याच्या शेवटी ईईएसएकडे आपला अहवाल सादर करावा लागेल असे ऊर्जा मंत्रालयांतर्गत असलेल्या एनर्जी एफिशियन्सी सव्हीस लिमिटेड( ईईएसएल) कंपनीच्या सूत्रांनी सांगितले.

उत्तर प्रदेशातील 15 हजार मीटर हटवणार

उत्तर प्रदेश सरकारने एका कंपनिला इंडोनेशियाची  कंपनि समजून स्मार्ट मीटरचा पुरवठा करण्याचे कंत्राट दिले होते ही कंपनी एका चीन कंपनीचा मुखवटा असल्याचे लक्षात आले त्यानंतर उत्तर प्रदेश सरकारने या कंपनीचे  कंत्राट रद्द केले असून ते घरात बसवलेले 15 हजार मिटर हटवण्याचा निर्णय घेतला आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.