नॉन कोविड रुग्णांच्या सोयीसाठी वॉर रूम स्थापना
जळगाव (प्रतिनिधी )
नॉन कोविड रुग्णांना येणा-या अडचणी सोडवण्यासाठी जिल्हा परिषद जळगांव येथे वॉर रूम स्थापन संपर्क क्रमांक ०२५७-२२२४२६८ कोविड-१९ विषाणु महामारीच्या प्रादुर्भावामुळे सद्यस्थितीत जळगांव जिल्हयातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा सामान्य रुग्णालयाचे कोविड रुग्णालयात रुपांतर करण्यात आलेले आहे तसेच काही खाजगी दवाखाने देखील कोविड-१९रुग्णाकरीता अधिग्रहीत करण्यात आलेले आहेत.अशा परिस्थितीत कोविड-१९ आजाराशिवाय अन्य व्याधी/आजाराच्या (नॉन कोविड) रुग्णांच्या उपचार व सोयी करीता जिल्हा प्रशासनाने जिल्हयातील ३३ रुग्णालयामध्ये महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेव्दारे सुविधा उपलब्ध करुन दिलेली आहे व सदर रुग्णालयाच्या नावाची यादी देखील उपलब्ध करुन दिलेली आहे.तथापि काही प्रसंगी अन्य आजाराच्या रुग्णांना याबाबत पुरेशी माहिती मिळत नसल्याने आरोग्य सुविधा उपलब्ध असलेल्या नेमक्या रुग्णालयात न जाता रुग्णांची इतरत्र म्हणजेच या रुग्णालयातुन दुस-या रुग्णालयात भटकंती होत असते.निश्चित कोणत्या आजार/व्याधी साठी कोणत्या रुग्णालयात सुविधा उपलब्ध आहेत, तेथील बेड्स (Beds) उपलब्धतता व इतर तत्सम उपकरणांची उपलब्धतता, इ.माहितीच्या अभावामुळे रुग्णांचे हाल होतात.यावर उपायोजना म्हणुन व रुग्णांना घरातुन निघतांनाच कोणत्या आजारासाठी कोणत्या रुग्णलयात जावे व तेथे खाटाची उपलब्धतता समजण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने Beds Availability & Management Systems हि ऑनलाईल प्रणाली यापुर्वीच सुरु करण्यात आलेली आहे तथापि ग्रामीण भागात संगणक/मोबाईल इंटरनेट इ ची सुविधा पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसते.
नॉन कोविड रुग्णांची होणार धावपळ थांबविण्यासाठी व त्यांना वेळेत उपचार उपलब्ध व्हावे याकरीता मा.जिल्हाधिकारी जळगांव व मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प.जळगांव यांचे मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद, जळगांव मध्ये वॉर रुम स्थापन करण्यात आलेला असुन सदर वॉर रुम आठवडयातील ७ दिवस पुर्ण २४ तास कार्यन्वित राहणार असुन या कक्षाचा संपर्क क्रमांक ०२५७-२२२४२६८ हा असुन वॉर रुम नोडल ऑफिसर म्हणुन श्री.आर.बी.जंगले, जिल्हा विशेष लेखापरिक्षक, वर्ग-१ सहकारी संस्था, जळगांव यांची नेमणुक करण्यात आलेली आहे.
या वॉर रुमच्या संपर्क क्रमांक ०२५७-२२२४२६८ वर संपर्क केल्यानंतर नॉन कोविड रुग्णांना महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेत समाविष्ठ रुग्णालयाची नांवे, तेथील उपलब्ध उपचाराची व्यवस्था, खाटांची उपलब्धता इ.बाबीची संपुर्ण माहिती उपलब्ध होणार आहे

कोणत्याही टिप्पण्या नाहीत