Contact Banner

जळगाव जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना पीकविमाची रक्कम लवकरात लवकर मिळावी - रावेर युवासेनेची मागणी

जळगाव जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना पीकविमाची रक्कम लवकरात लवकर मिळावी - रावेर युवासेनेची मागणी



 रावेर( प्रतिनिधी )-जे शेतकरी पीकविमा पात्र झालेले आहेत त्यांची पीकविमा संरक्षण रक्कम लवकरात लवकर मिळावी  याचे निवेदन रावेर तालुका युवासेना तालुकाप्रमुख प्रवीण पंडित व युवासेना उपतालुका प्रमुख तुषार कचरे यांनी मुख्यमंत्री , कृषीमंत्री पालकमंत्री गुलाबराव पाटील , आमदार चंद्रकांत पाटील यांना ईमेल द्वारे केली आहे.
         जळगाव जिल्यातील शेतकरी प्रचंड अडचणींना सामोरे जात असताना , त्यांना देशावर आलेल्या या महाभयंकर कोरोना महामारीचा सामना करत असताना त्यांना अनेक अडचणी येत आहेत.. जिल्ह्यातील शेतकऱ्यांची केळी मातीमोल भावात विकली जात तर आहेच त्यांनी केळीला लावलेला खर्चही निघू शकत नाहीय तसेच त्यांच्या अन्य पिकांनाही योग्य तो भाव मिळत नसल्याने शेतकरी प्रचंड निराशाजनक व तणावात आलेले आहेत , पाऊसही वेळेवर पडत नसल्याने अनेक शेतकऱ्यांना दुबार पेरणीचे संकट आलेले आहे..शेतकरी बांधवांच्या वतीने सरकारला निवेदन द्वारे विनंती करण्यात आली आहे , जे शेतकरी पीकविमा पात्रता धारक आहेत त्यांना पीकविमाची रक्कम लवकरात लवकर मिळावी जेणेकरून जो अवघ्या जगाचा पोशिंदा आहे शेतकरी राजा त्यांच्या हक्काची असलेली रक्कम त्यांना लवकरात लवकर मिळावी व आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकरी राज्याला आपण या कोरोना महामारीच्या काळात पाठीशी उभं रहावे.  
         महाराष्ट्र राज्यातील सरकार शेतकऱ्यांसाठी सदैव तत्पर असतांना मुख्यमंत्री व कृषीमंत्री यांना दिलेल्या निवेदनाच्या माध्यमातून नक्कीच जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काची असलेली पीकविमा संरक्षण रक्कम लवकरात लवकर मिळेल अशी खात्री युवासेना तालुका प्रमुख प्रवीण पंडित व युवासेना उपतालुका प्रमुख तुषार कचरे यांनी व्यक्त केली आहे..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.