Contact Banner

फेसबुक,Pubg,डेलीहंटसारखे 89 ॲप देशासाठी धोकादायक

फेसबुक,झूम,डेलीहंटसारखे 89 ॲप देशासाठी धोकादायक
लष्कराच्या जवानांना असे ॲप डिलीट करण्याचे संरक्षण मंत्रालयाचे निर्देश

नवी दिल्ली वृत्त:-
संरक्षण मंत्रालयाने लक्ष रातील 13 लाख जवान आणि अधिकाऱ्यांना त्यांच्या फोन मधून डेली न्यूज हंट न्यूज ॲप फेसबूक इंस्टाग्राम टिक टॉक झूम पब्जीसह 89 ॲप्स 15 जुलैपर्यंत डिलीट करण्याचे निर्देश दिले आहेत संरक्षण मंत्रालयाच्या सूत्रानुसार या ॲपमुळे  देशातील संवेदनशील माहिती लिक होत आहे देशाच्या सुरक्षेसाठी धोका मानत लष्कराणे  म्हटले आहे की जे या आदेशाचे पालन करणार नाहीत यांच्याविरुद्ध कळप कारवाई केली जाईल या 89 ॲप्समध्ये 59 चीनी ॲप्सचाही समावेश आहे ज्यांच्यावर नुकतीच सरकारने बंदी घातली आहे
एका अधिकाऱ्याने सांगितले की लष्करातील जवानांना ऑनलाइन टार्गेट करण्याचे प्रकार वाढले आहेत सोशल मीडियावर लष्करी कर्मचाऱ्यांना हनीट्रॅपमध्ये अडकवून पाकची गुप्तचर संस्था आयएसआयसाठी हेरगिरी करत असल्याच्या घटना उघडकीस आल्या लष्करसाचा दावा आहे की अँपद्वारे माहिती मिळून पाकिस्तान व चीन सारखे देश सीमा व नियंत्रण रेषेवर अडचणी निर्माण करत आहे लष्कराने नोव्हेंबरमध्ये कर्मचाऱ्यांना कामकाजासाठी व्हाट्सअप चा वापर टाळण्याचा सल्ला दिला आहे संवेदनशील पदांवरील अधिकाऱ्यांना फेसबुक अकाउंट डिलीट करण्याचे सूचनाही यापूर्वी करण्यात आली होती भारतीय लष्कराने बंदी  घातलेल्या 89 आपच्या यादीत न्यूज डॉग ,ट्रु काँलर, क्लब फॅक्टरी, यूसी ब्राऊझर, कॅम्प स्कॅनर ,ब्युटी प्लस, व्हीचँट ,हंगामा, स्नॅपचॅट ,शेअरइट,आणि टिंडरचा समावेश आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.